मुंबई - निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या फाशीच्या शिक्षेवर सुधारीत याचिकेचा माध्यमातून शिक्षेवर स्थगिती आणली नसल्याने 22 जानेवारील सकाळी सात वाजता फाशी देण्यात येणार असल्याचे वकील स्वप्ना कोदे यांनी सांगितले आहे. मात्र, या एक ते दोन दिवसांमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये सुधारित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे आरोपीचे वकील ए. पी. सिंग यांनी सांगितले.
हेही वाचा - निर्भया बलात्कार प्रकरण: न्यायालयाचे देशभरातून स्वागत, न्यायास विलंब झाल्याची मात्र खंत
दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाकडून आरोपींच्या फाशीच्या संदर्भात त्यांचे डेथ वॉरंट हे साईन झाले असून 22 जानेवारीच्या दिवशी त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचेही अॅड. कोदे यांनी म्हटले आहे. निर्भया प्रकरण हे अमानुष होते, पटियाला हाऊस कोर्टाकडे आलेल्या निर्णयानंतर त्याची अंमलबजावणी झाली तर निर्भयाला ही खरी श्रद्धांजली असेल व तिच्या कुटुंबीयांना खरा न्याय मिळेल, असेही कोदे यावेळी म्हणाल्या.
हेही वाचा - बिहार: पाटनामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार