नवी दिल्ली Emergency Landing : मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला शनिवारी दाट धुक्यामुळं बांगलादेशची राजधानी ढाका येथे आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. गुवाहाटी विमानतळावर उतरण्यास असमर्थ ठरल्यानंतर, उड्डाण आसामच्या राजधानीपासून 400 किलोमीटरहून अधिक अंतरावर असलेल्या ढाक्याकडे वळवण्यात आलं. यामध्ये, युवक काँग्रेसचे माजी प्रमुख सूरज सिंह ठाकूर हे भारत जोडो न्याय यात्रेसाठी जात होते. त्याच दरम्यान, मोठ्या प्रमाणात धुकं निर्माण झालं होतं. त्यावरून विमान हे वळवण्यात आलं. सुमारे 9 तासापासून विमान एकाच जागी थांबून होतं. तसंच, इंडिगोकडूनही कोणतीचं माहिती अद्याप समोर आली नाही.
-
Guwahati-bound IndiGo flight lands in Dhaka due to bad weather
— ANI Digital (@ani_digital) January 13, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/OhxVUdj092#IndiGo #Dhaka #Guwahati pic.twitter.com/swKEskANim
">Guwahati-bound IndiGo flight lands in Dhaka due to bad weather
— ANI Digital (@ani_digital) January 13, 2024
Read @ANI Story | https://t.co/OhxVUdj092#IndiGo #Dhaka #Guwahati pic.twitter.com/swKEskANimGuwahati-bound IndiGo flight lands in Dhaka due to bad weather
— ANI Digital (@ani_digital) January 13, 2024
Read @ANI Story | https://t.co/OhxVUdj092#IndiGo #Dhaka #Guwahati pic.twitter.com/swKEskANim
आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती : इंफाळमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी जाणारे मुंबई युवक काँग्रेसचे माजी प्रमुख सूरजसिंग ठाकूर यांनी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ते मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या विमानामध्ये होते. तेव्हा विमान वळवण्यात आलं होतं. मी इंडिगो 6E फ्लाइट क्रमांक 6E 5319 ने मुंबईहून गुवाहाटीला जात होतो. मात्र, दाट धुक्यामुळे विमान गुवाहाटीत उतरू शकलं नाही. त्याऐवजी ते ढाक्यात उतरलं. त्यांनी सांगितलं की, विमानातील सर्व प्रवाशांनी त्यांच्या पासपोर्टशिवाय आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती. ठाकूर म्हणाले की प्रवासी अजूनही विमानातच आहेत.
ढाक्याच्या दिशेने का वळवण्यात आलं हे अस्पष्ट : दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, मी आता 9 तासांपासून विमानात अडकलो आहे. भारत जोडो न्याय यात्रेसाठी मी मणिपूर (इंफाळ) येथून निघालो आहे. आता पाहू मी गुवाहाटीला कधी पोहोचतो ते असंही ते म्हणालेत. तेथे पोहचल्यावर मी पुन्हा इम्फाळला जाईन. उड्डाण ढाक्याच्या दिशेने का वळवण्यात आलं हे स्पष्ट झालेलं नाही. तसंच, याबाबत इंडिगोकडून या कोणतंही वक्तव्य जारी केलेलं नाही.
हेही वाचा :
1 "पंतप्रधान मोदींनी देवेंद्र फडणवीसांचे टोचले कान", सुप्रिया सुळेंची उपरोधिक टीका
2 उरण ते खारकोपर लोकलचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
3 सिनेमा हे माझं जग, तर थिएटर हे माझं घर! दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा 'एशियन कल्चर' पुरस्काराने सन्मान