ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : मोठ्या गणेशमूर्ती नसल्याने यंदा कलाकारांवर उपासमारीची वेळ

author img

By

Published : Aug 18, 2020, 12:55 PM IST

बाप्पाची उंच मूर्ती तयार झाल्यानंतर कलाकुसर करणारे कारागीर मूर्तींना जास्त आकर्षक करण्याचे काम करतात. गणेश मूर्तींचे डोळे रेखाटने, दागिने रंगवणे अशी कामे करणारे वेगळे कलाकार असतात. यंदा मूर्तीबाबत नियमावली असल्यामुळे मोठ्या मूर्तींची स्थापना होणार नाही आहे. यामुळे या कलाकारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

Ganesh Idol
गणपती

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. त्यासाठी काही मार्गदर्शक सुचनादेखील शासनाने जाहिर केल्या आहे. त्यामध्ये मोठ्या गणेशमूर्ती स्थापन न करण्याचीही सूचना आहे. त्यामुळे यावर्षी मूर्तीकारांनी मोठ्या गणेशमूर्ती तयार केल्या नाहीत. परिणामी मूर्तींवर कलाकुसर करणाऱ्या अनेक कलाकारांना रोजगार मिळेनासा झाला आहे. याबाबत ई टीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट..

मोठ्या गणेशमूर्ती नसल्याने यंदा कलाकारांवर उपासमारीची वेळ

दरवर्षी गणेशोत्सवाच्या अगोदर बाजारपेठा आणि गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये लगबग दिसून येते. मात्र, यावर्षी ही लगबग आणि उत्साह दिसत नाही. यावर्षी मोठ्या गणेशमूर्ती नसल्यामुळे जो उत्साह मुंबईत दरवर्षी असतो तो यंदा नसणार आहे. उंचच उंच गणेश मूर्तींचा थाट काही वेगळाच असतो. बाप्पाची उंच मूर्ती तयार झाल्यानंतर कलाकुसर करणारे कारागीर मूर्तींना जास्त आकर्षक करण्याचे काम करतात. गणेश मूर्तींचे डोळे रेखाटने, दागिने रंगवणे अशी कामे करणारे वेगळे कलाकार असतात. यंदा मूर्तीबाबत नियमावली असल्यामुळे मोठ्या मूर्तींची स्थापना होणार नाही आहे. यामुळे या कलाकारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

गणेशोत्सवात कोट्यवधींची उलाढाल होत असते. भव्य व एकापेक्षा एक सरस उंच मूर्ती आणि मुंबई असे समीकरण असते. यंदा मात्र छोट्या मूर्तींची स्थापना केली जाणार आहे. यामुळे या मूर्तीशी निगडीत असणारे कलाकार बेरोजगार झाले आहेत. ज्या छोट्या मुर्तींचे काम मिळत आहे तेही अत्यंत कमी असल्याचे हे कलाकार सांगतात.

'गेल्या अनेक वर्षांपासून मी मोठ्या गणेश मूर्तींचे डोळे आणि दागिन्यांची सजावट करण्याचे काम करतो. यंदा मात्र उंच मूर्तींसाठी परवानगी नसल्याने हाताला काम नाही. सध्या आमच्याकडे ज्या ऑर्डरर्स आहे त्या छोट्या मूर्तींच्या आहेत. पण त्यातून मिळणारा नफा हा तुटपुंजा आहे,' असे कलाकार मनीष गावंडे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.