नवी मुंबई - कोरोना लसीकरणासाठी दुसरी ड्राय रन मोहीम राबवण्यात येत आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन व प्रत्येक महापालिका क्षेत्रात एक असा ड्रायरन आरोग्य संस्थेत घेण्यात येत आहे. यापूर्वी 2 जानेवारी चार ड्रायरन मोहिम राबवण्यात आली होती. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ड्रायरन घेतली जात आहे. या मोहिमेसाठी आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे.
प्रत्येक केंद्रावर होणार 25 लाभार्थ्यांचे लसीकरण
प्रत्येक केंद्रावर 25 लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा तिसरा टप्पा यशस्वी झाला आहे. पण याआधीच भारत बायोटेकच्या लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. आज लसीची दुसऱ्यांदा रंगीत तालीम होत आहे. तर या सर्व लसींच्या ट्रान्सपोर्टेशनलाही लवकरच सुरुवात होते आहे. सीरमची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीचा समावेश आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम घेतली जात आहे. कोरोना लसीकरणाच्या या ड्रायरनचा आज दुसरा टप्पा असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महाराष्ट्रातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्रायरन मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये 3 आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेमध्ये 1 आरोग्य संस्था याठिकाणी ड्रायरन घेण्यात येईल. दरम्यान भारतात सिरम आणि बायोटेक या कंपनाच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या वापरास परवानगी दिली आहे.
हेही वाचा - जगभरातील देशांशी संबध सुधारण्याची किम-जोंग-उन यांची शपथ