ETV Bharat / state

देशभरात आज 'ड्राय रन'; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात लसीकरणाची रंगीत तालीम - चार जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम

कोरोना लसीकरणाच्या तारखेची घोषणा करण्याआधी सर्व तयारीची चाचपणी, केंद्र सरकारकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून देशभरातील सर्व राज्यांमध्ये 'ड्राय रन' घेतली जात आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार या ४ जिल्ह्यात 'ड्राय रन' होत आहे.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Jan 2, 2021, 4:34 PM IST

मुंबई - भारतामध्ये कोरोना लसीची तयारी पूर्ण झाली आहे. आता लवकरच लसीकरणाला देखील सुरुवात केली जाणार आहे. मात्र, लसीकरणाच्या तारखेची घोषणा करण्याआधी सर्व तयारीची चाचपणी, केंद्र सरकारकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून देशभरातील सर्व राज्यांमध्ये 'ड्राय रन' घेतली जात आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार या ४ जिल्ह्यात 'ड्राय रन' होत आहे.

पुणे जिल्ह्यात तीन केंद्रांवर कोविड-19 लसीकरणाचा 'ड्राय रन' घेतला गेला. यामध्ये पुणे जिल्हा रुग्णालय, औंध तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मान आणि जिजामाता रुग्णालय पिंपरी चिंचवड या ठिकाणांचा समावेश आहे. प्रत्येक केंद्रांवर प्रत्येकी पंचवीस लाभार्थी बोलवण्यात आले होते.

नागपुरात तीन ठिकाणी कोविड लसीकरणाची ड्राय रन

शहारात डागा हॉस्पिटल आणि के टी नगर प्राथमिक आरोग्य केंद्र तर ग्रामीममध्ये कामठी रुग्णालयांचा यात समावेश होता. ड्राय रन प्रत्येक केंद्रावर २५ असे तीन ठिकाणचे मिळून ७५ जणांवर होणार प्रात्यक्षिक, प्रत्येक केंद्रावर चार लसीकरण अधिकारी उपस्थित होते. सर्वात अगोदर कोरोना अ‌ॅपमध्ये केली जात आहे एन्ट्री

नंदुरबारमध्ये ड्राय रन

कोरोना लसीचा ड्राय रन आज नंदुरबार जिल्ह्यात होत आहे. राज्यात चार ठिकाणी हा ड्राय रन केला जात असून, यात नंदुरबार जिल्ह्याचा देखील समावेश आहे. जिल्ह्यातील तीन ठिकाणी हा लस देण्याचा ड्राय रन केला जाणार आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णलय, आष्टे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नवापूर उपरुग्णालायत हा ड्राय रन केला जात आहे. यासाठी आवश्यक ती सर्व तयार पूर्ण करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रात पाच कर्मचारी लस देण्याची प्रक्रिया पार पडणार आहेत. तसेच प्रत्येक केंद्रावर आज २५ जणांना लस देण्याचे प्रात्यक्षिक होणार असून तीन ठिकाणी एकूण ७५ जणांना लस देण्याचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे. लस घेण्याच्या प्रक्रियेत सामील ७५ जण हे आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत. या सर्व प्रक्रियेवर लक्ष देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राहणार आहे. राज्यासह देशभरात विविध ठिकाणी 'ड्राय रन' घेतली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.