मुंबई : ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी (Drunken Drive Cases In Mumbai) 156, रॅश ड्रायव्हिंग म्हणजेच धोकादायकपणे आणि अति वेगाने वाहन चालवणाऱ्या 66 जणांवर कारवाई करण्यात आली. हेल्मेट विना दुचाकी चालवणाऱ्या वाहतूक पोलिसांनी (Mumbai Traffic Police) कारवाईचा बडगा उचलला आहे. (New Year celebration) त्याचप्रमाणे पीपल सीट दुचाकी चालवणारा 274 जणांवर कारवाई करण्यात आली. सिग्नल तोडणाऱ्या 679 वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. (Mumbai Crime) तसेच नो एंट्री मधून वाहन चालवणाऱ्या 635 वाहन चालकांवर तर विरुद्ध दिशेने वाहन चालवणारा 238 वाहनचालकांवर तर नो पार्किंग मध्ये वाहन पार्क केलेला 3 हजार 87 जणांवर वाहतूक पोलिसांनी 31 च्या रात्री कारवाई केली आहे. (Latest news from Mumbai)
दारुड्यांविरुद्ध 8 हजार 678 कारवाया : त्याचप्रमाणे दुचाकी आणि चार चाकी वाहने तो करण्याच्या 362 कारवाया करण्यात आल्या. अशाप्रकारे मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने थर्टी फर्स्टच्या रात्री तळीरामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईचा बडगाच उचललेला होता. एकूण 8 हजार 678 कारवाया वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत.
100 ठिकाणी नाकेबंदी : नवीन वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करण्यासाठी समुद्र किनारे, पर्यटन स्थळे, रेस्टोरंट्स, पब आदी ठिकाणी मोठी गर्दी उसळली होती. मुंबई शहर आणि उपनगरात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवळपास 100 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. अनेक ठिकाणचे मार्ग बदलण्यात आले. तर काही ठिकाणे 'नो पार्किंग झोन' तयार करण्यात आले होते.