ETV Bharat / state

रमजान काळात ड्रोनद्वारे पाहणी करणार मुंबई पोलीस - कोरोना

कंटेन्टमेंट झोन आणि मुस्लीमबहुल परिसरात शासन, सामाजिक संघटना यांच्यावतीने अत्यावश्यक सेवा पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली आहे. यामुळे जीवनाश्यवक वस्तूंचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहिल, यामुळे सेहरी आणि इफ्तारच्या खरेदीसाठी कोणालाही बाहेर पडण्याची गरज नाही, असे निशानदार म्हणाले.

drones-to-watch-over-ramzan-gatherings-in-mumbai
मुंबई रमजान काळात ड्रोनद्वारे पाहणी करण्याचा पोलिसांचा निर्णय
author img

By

Published : Apr 25, 2020, 9:46 AM IST

मुंबई- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मुंबईतील मुस्लीमबहुल ठिकाणी रमजानच्या महिन्यात नजर ठेवण्यात येणार आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. रमजानचा पवित्र महिना शनिवारपासून सुरू होत आहे. लॉकडाऊन मुस्लीम समाजाला सेहरी आणि इफ्तारच्या खरेदीसाठी कोणतीही सूट देण्यात आलेली नाही, असे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी सांगितले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

रमजानच्या काळात लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी पोलिसांनी सर्व प्रकारची तयारी केली आहे, असे परिमंडळ विभाग एकचे पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळावेत. कोणत्याही मशिदीमध्ये, इमारतीच्या टेरेसवर जमा होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नियमांचा भंग होऊ नये म्हणून ड्रोनच्याद्वारे नजर ठेवण्यात येईल आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे निशानदार यांनी माध्यमांना सांगितले.

कंटेन्टमेंट झोन आणि मुस्लीमबहुल परिसरात शासन, सामाजिक संघटना यांच्यावतीने अत्यावश्यक सेवा पोहोचवण्यासाठी व्यवस्था केली आहे. यामुळे जीवनाश्यवक वस्तूंचा पुरवठा अखंडितपणे सुरू राहिल, यामुळे सेहरी आणि इफ्तारच्या खरेदीसाठी कोणालाही बाहेर पडण्याची गरज नाही, असे निशानदार म्हणाले.

मशिदींमधून अजानची घोषणा करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, नमाज पठण करण्यासाठी मशिदीमध्ये जमा होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. रमझानच्या खऱेदीसाठी प्रसिद्ध असणारा मुंबईतील मोहम्मद अली रोड गेल्या 250 वर्षांमध्ये पहिल्यांदा कोरोनामुळे बदं ठेवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, समाजवादी पार्टीचे नेते अबु असीम आझमी, काँग्रेस नेते नसीम खान आणि इतर मान्यवरांनी रमजान निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष पी.ए.इनामदार यांनी पुण्यातीलआझम कॅम्पस मशीद कोरोना रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे. या ट्र्स्टची 9 हजार चौरस फुटांची प्रार्थना करण्याच्या जागेत क्वारंटाइन रुग्णांना सर्व सोयी आणि अन्नाची व्यवस्था करणार असल्याचे इनामदार यांनी सांगितले.

मुस्लीम समाजाचे नेते आणि धर्मगुरुंनी वारंवार लॉकडाऊनच्या नियमांचे पालन आणि शासनाला सहकार्य करण्याचे आवाहन राज्यातील मुस्लीम बांधवांना केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.