ETV Bharat / state

मुंबई कस्टम विभागाकडून दीड कोटींचे ड्रोन कॅमेरे जप्त - drone cameras seized

भारतात अनधिकृतरीत्या तस्करीच्या माध्यमातून आणण्यात आलेल्या ड्रोन कॅमेरांच्या मोठ्या साठ्यावर कस्टम विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. कस्टम प्रिवेन्टिव्ह आणि मरिन प्रिवेन्टिव्हकडून मुंबईसह, राजस्थान येथे वेगवेगळ्या ठिकाणी मारण्यात आलेल्या छाप्यात तब्बल दीड कोटी रुपयांचे ड्रोन कॅमेरे जप्त करण्यात आले.

drone camera
ड्रोन कॅमेरा
author img

By

Published : Jan 27, 2020, 11:16 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात विना परवाना ड्रोन कॅमेरांच्या वापरावर व विक्रीवर कायद्याने बंदी आहे. भारतात अनधिकृतरीत्या तस्करीच्या माध्यमातून आणण्यात आलेल्या ड्रोन कॅमेरांच्या मोठ्या साठ्यावर कस्टम विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. कस्टम प्रिवेन्टिव्ह आणि मरिन प्रिवेन्टिव्हकडून मुंबईसह, राजस्थान येथे वेगवेगळ्या ठिकाणी मारण्यात आलेल्या छाप्यात तब्बल दीड कोटी रुपयांचे ड्रोन कॅमेरे जप्त करण्यात आले आहेत.

मुंबई सीमा शुल्क प्रतिबंधक विभागाकडून दीड कोटींचे ड्रोन कॅमेरे जप्त...

हेही वाचा... 'तसं' झाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याच्या आम्हाला सुचना, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

मुंबईसह देशभरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे ड्रोन कॅमेरांची विक्री होत असल्याचाही माहिती कस्टम विभागाला मिळाली. त्यानंतर कस्टम प्रिवेन्टिव्हकडून ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या प्रत्येक ड्रोन कॅमेराचे वजन 249 ग्र‌ॅम असून 15 ते 20 मीटर उंचीपर्यंत जाण्याची या ड्रोन कॅमेरांची क्षमता आहे. 4 किलोमीटर पर्यंत हे कॅमेरे नियंत्रित करण्यात येत असल्याची माहिती कस्टम विभागाच्या कस्टम प्रिवेन्टिव्हचे अधीक्षक अंजुम तडवी यांनी दिली.

हेही वाचा... शिवसेनेवर विश्वास नाही, इतकी लाचारी कशी...

जप्त कॅमेरांची क्षमता पाहता या ड्रोन कॅमेरांचा वापर मुंबई सारख्या शहरातील विमानतळ, संशोधन केंद्र व लष्करी आस्थापनेवर रेकी करण्यासाठी करण्यात येऊ शकत होता. यामुळे एकंदरीत अतिमहत्वाच्या ठिकाणाच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होऊ शकला असता. ड्रोन कॅमेरांच्या विक्री व वापरासाठी कायद्याप्रमाणे ड्रोन कॅमेरा जर इंपोर्ट करायचा असेल तर डिजीसीए (DGCA) ह्या विभागाची परवानगी लागते. त्यानंतर ड्रोनच्या वापर करण्यासाठी डिजीएफटी ( DGFT) ह्या विभागाचा परवाना असणे गरजेच आहे . मात्र मुंबईच्या एसकॉम सिस्टम मारोळ व जयपुरच्या ड्रोन गोडाउन मीडिया ह्या दोन्ही कंपन्यानी कुठलीही परवानगी किंवा परवाना न घेता अनधिकृतरित्या ड्रोन कॅमेरांची विक्री करत होते.

Intro:मुंबई सारख्या देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात विना परवाना ड्रोन कॅमेरांच्या वापरावर व विक्रीवर कायद्याने बंदी आहे. भारतात अनधिकृतरीत्या तस्करीच्या माध्यमातून आणण्यात आलेल्या ड्रोन कॅमेरांच्या मोठ्या साठ्यावर कस्टम विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. कस्टम प्रिवेन्टिव्ह मरिन प्रिवेन्टिव्ह कडून मुंबईसह , राजस्थान येथे वेगवेगळ्या ठिकाणी मारण्यात आलेल्या छाप्यात तब्बल दिड कोटी रुपयांचे ड्रोन कॅमेरे जप्त करण्यात आले आहेत. Body:मुंबई सह देशभरात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे ड्रोन कॅमेरांची विक्री होत असल्याचाही माहिती कस्टम विभागाला मिळाल्यावर कस्टम प्रिवेन्टिव्ह कडून ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या प्रत्येक ड्रोन कॅमेराचे वजन 249 ग्राम असून 15 ते 20 मीटर उंची पर्यंत जाण्याची या ड्रोन कॅमेरांची क्षमता आहे. 4 किलोमीटर पर्यंत हे कॅमेरे नियंत्रित करण्यात येत असल्याची माहिती कस्टम विभागाच्या कस्टम प्रिवेन्टिव्ह चे सुप्रीटेंडन्ट अंजुम तडवी यांनी दिली . जप्त कॅमेरांची क्षमता पाहता या ड्रोन कॅमेरांचा वापर मुंबई सारख्या शहरातील विमानतळ , संशोधन केंद्र व लष्करी आस्थापनेवर रेकी करण्यासाठी करण्यात येऊ शकत होता. यामुळे एकंदरीत अतिमहत्वाच्या ठिकाणाच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होऊ शकला असता.

ड्रोन कॅमेरांच्या विक्री व वापरासाठी कायद्याप्रमाणे ड्रोन कॅमेरा जर इंपोर्ट करायचा असेल तर डिजीसीए (DGCA) ह्या विभागाची परवानगी लागते. त्यानंतर ड्रोनच्या वापर करण्यासाठी डिजीएफटी ( DGFT) ह्या विभागाचा परवाना असणे गरजेच आहे . मात्र मुंबईच्या एसकॉम सिस्टम मारोळ व जयपुरच्या ड्रोन गोडाउन मीडिया ह्या दोन्ही कंपन्यानी कुठलीही परवानगी किंवा परवाना न घेता अनधिकृतरित्या ड्रोन कॅमेरांची विक्री करत होते. Conclusion:( बाईट ...अंजुम तड़वी सुपरिंटेंडेंट .कस्टम प्रिवेंटिव्ह मुंबई )

(रेडी टू अपलोड पॅकेज जोडले आहे.)
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.