मुंबई: राज्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन (Violation of traffic rules) करणाऱ्या चालक व मालकांची वाहने न अडवता वाहतूक पोलीस, आरटीओ आणि पोलीस प्रशासनाकडून वाहन चालकांच्या गाडीचा क्रमांकाचे छायाचित्र काढुन वाहन चालकांना दंडाची माहिती मोबाईलवर संदेशद्वारे पाठविली जाते. वाहन चालकांना हा दंड पोलिसांच्या संकेतस्थळावर तसेच पोलिसांकडे डेबिट कार्डद्वारे भरता येतो. मात्र बहुतांश वाहन चालक ई-चलनाची रक्कम भरत नाही. हे सातत्याने पहायला मिळत आहे.
थकीत असलेल्या दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून लोक अदालतीची नोटीस पाठवण्यात येत असते. 7 मे 2022 रोजी राज्यातील सर्व न्यायालयामध्ये लोक अदालतींचे आयोजन करण्यात आले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या तब्बल 96 लाख 867 वाहनांना नोटीस पाठवण्यात आल्या आहे. या सर्व वाहनांवर वाहतूक विभागाच्या 1हजार 90 कोटी रुपयांच्या दंडाची वसुली प्रलंबित आहे. हीच दंड वसुली करण्यासाठी वाहतूक विभागाने लोक अदालतची मदत घेतली. आतापर्यंत पाठवलेल्या नोटिसांच्या माध्यमातून राज्यातील 3 लाख 44 हजार 866 ई चलान निकाली निघाले आहेत. त्या ई- चलानच्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत 17 कोटी 58 लाख 26 हजार 600 रुपयांचा दंड जमा झाला आहे.
हेही वाचा : Phone Taping Case : रश्मी शुक्ला यांच्याविरोधात 700 पानांचे आरोपपत्र दाखल