ETV Bharat / state

Slot For Driving License : फेसलेस सुविधेमुळे आरटीओंवरील वाढला ताण; परमनंट लायसन्सच्या स्लॉट बुकिंगसाठी चालकांची धडपड

वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना ( Learning License ) साठी फेसलेस सेवा सुरू केली आहे. या सेवेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने परिवहन विभागासमोर एक मोठे संकट निर्माण झाले आहे. लर्निंग लायसन्सनंतर पक्का परवाना ( Driving License ) काढण्यासाठी मुंबईतील प्रत्येक आरटीओमध्ये दररोज हजारो चालक स्लॉट बुकिंगसाठी ( Slot For Driving License) धडपडत आहेत. अशात मुंबई सेंट्रलच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात ( Mumbai Central RTO ) दररोज होणाऱ्या ६३० चाचण्यांची संख्या ९०३पर्यंत वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ९०३ पैकी १५४ चाचण्यांचा कोटा ज्यांच्या शिकाऊ परवान्याची मुदत संपत आली आहे. त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jan 23, 2022, 7:13 PM IST

मुंबई - वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना ( Learning License ) साठी फेसलेस सेवा सुरू केली आहे. या सेवेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने परिवहन विभागासमोर एक मोठे संकट निर्माण झाले आहे. लर्निंग लायसन्सनंतर पक्का परवाना ( Driving License ) काढण्यासाठी मुंबईतील प्रत्येक आरटीओमध्ये दररोज हजारो चालक स्लॉट बुकिंगसाठी ( Slot For Driving License ) धडपडत आहेत. पुढील महिन्याभराचे स्लॉट बुक असल्याने लर्निंग लायसन्स काढलेल्या चालकांना पक्क्या लायसन्ससाठी किती वेळ प्रतीक्षा करावी लागणार, असा सवाल लर्निग लायसन्स धारकांकडून विचारला जात आहे.

हजारो चालकांची स्लॉट बुकिंगसाठी धडपडत- गेल्या काही महिन्यापूर्वी परिवहन विभागाने लर्निंग लायसन्ससाठी फेसलेस सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता लर्निंग लायसन्ससाठी वाहन चालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालया ( Regional Transport Office ) जाण्याची गरज नाही. फेसलेस सेवेच्या माध्यमातून अर्जदारांना घरीच लर्निंग लायसन्स चाचणी देणे शक्य झाले. मात्र, त्याचा विपरित परिणाम पक्का वाहन परवाना काढताना सहन करावा लागत आहे. लर्निंग लायसन्स काढण्याच्या संख्येवर परिवहन विभागाचे नियंत्रण नसल्याने एकाच दिवशी लाखो चालक लर्निंगसाठी अर्ज करत आहेत. लर्निंग लायसन्स काढल्याच्या एका महिन्यापासून सहा महिन्यांपर्यंतच्या अवधीत चालकांना परमनंट लायसन्स काढण्याची मुभा आहे. त्यामुळे आरटीओ कार्यकायात परमनंट लायसन्ससाठी मुंबईतील प्रत्येक आरटीओमध्ये दररोज हजारो चालक स्लॉट बुकिंगसाठी ( Slot Booking For DL ) धडपडत आहेत.

लर्निंग लायसन्सची मुदत वाढून द्यावीत - मिळालेल्या माहितीनुसार, परमनंट लायसन्सच्या स्लॉट बुकिंगसाठी दररोज सकाळी १० वाजता खुली होणारी ऑनलाइन खिडकी पुढील १५ ते २० मिनिटांतच स्लॉट फुल्ल झाल्याने बंद होत आहे. त्यामुळे मुदत संपत आलेल्या लर्निंग लायसन्स धारकांचे धाबे दणाणले आहेत. परिवहन विभागाने स्लॉट उपलब्ध करून द्यावेत किंवा लर्निंग लायसन्सची मुदत आणखी वाढवावी, अशी मागणी चालकांमधून केली जात आहे.

चाचण्यांची संख्येत वाढ - मुंबई सेंट्रलच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात ( Mumbai Central RTO ) दररोज होणाऱ्या ६३० चाचण्यांची संख्या ९०३पर्यंत वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यातही ज्यांचा लर्निंग लायसन्सची मुदत संपण्यास आलेली आहे, अशा चालकांसाठी दररोज ९०३ पैकी १५४ चाचण्यांचा कोटा राखीव ठेवण्यात आलेला आहे. २४ जानेवारीपासून कोट्यातील वाढीचा उपयोग चालकांना करता येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोट्यात वाढ केल्याने सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्लॉट उपलब्ध झाल्याची माहिती मुंबई सेंट्रलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.