ETV Bharat / state

DRI Seized Smuggled Gold: डीआरआयची मोठी कारवाई; 21 कोटी रुपयांचे तस्करी सोने केले जप्त, सिंडिकेटचा भाग असल्याचा संशय - सीमा शुल्क कायद्यांतर्गत अटक

सोमवारी महसूल गुप्तचर संचालनालयाने उपनगरातील अंधेरी येथील एअर कार्गो कॉम्प्लेक्समधून 21 कोटी रुपयांचे 36 किलो तस्करी केलेले सोने आणि 20 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली. पुढील तपास सुरू आहे, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

DRI Seized Smuggled Gold
रोख तस्करी केलेले सोने जप्त
author img

By

Published : Jan 25, 2023, 10:09 AM IST

Updated : Jan 25, 2023, 10:32 AM IST

मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. डीआरआयला काळबादेवी येथील तस्करीच्या सोन्याच्या वितळण्याच्या आणि प्रक्रिया करणाऱ्या युनिटकडे नेले. धनजी स्ट्रीट, काळबादेवी येथे झडती घेण्यात आली. डीआरआयने मेल्टिंग युनिटचा प्रभारी प्रशांत मोहन माईकर याला अटक केली. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून परदेशी नागरिकांच्या माध्यमातून भारतात होणाऱ्या सोने तस्करीचा पॅटर्नचा डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अभ्यास केला होता.

प्रवासाच्या धर्तीवर पाळत : या दरम्यान काही विशिष्ट परदेशी नागरिक सातत्याने भारतामध्ये येत असल्याचे त्यांना आढळून आले. तसेच इथे आल्यावर ज्या भारतीय नागरिकांशी ते संपर्क करत त्यांची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. ही माहिती जमा केल्यानंतर सोन्याच्या तस्करीचे एक मोठे रॅकेट सुरू असल्याचे त्यांना समजले. या तस्करी केलेल्या सोन्याचे पेमेंट हवालामार्गे केली जात असल्याची माहिती देखील प्राप्त झाली होती. त्यानंतर डीआरआयने काही परदेशी नागरिकांच्या प्रवासाच्या धर्तीवर पाळत ठेवली. या सिंडिकेटचा पर्दाफाश करताना काही भारतीयांचा समावेश असल्याचा संशय आला, असे अधिकाऱ्याने सांगितले. आरोपीने माहिती दिली आहे की, त्याने वेगवेगळ्या व्यक्तींकडून सोने खरेदी केले होते. त्यापैकी काही परदेशी नागरिकांचकडून कॅप्सूलच्या रूपात लपवून, प्रवासी बॅगमध्ये, कपड्यांचे थर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनमध्ये तस्करी केली होती.

विशिष्ट कोड वापरून व्यवहार : पुढील तपासात असे दिसून आले की, हे सोने विविध देशांतर्गत खेळाडूंना दिले जात होते. हा सिंडिकेटचा भाग असल्याचा संशय आहे. दररोज विशिष्ट कोड वापरून हे व्यवहार होत असल्याची माहिती मिळालेली आहे. आरोपीला सीमा शुल्क कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. ही तस्करी उधळून लावण्यासाठी काही परदेशी नागरिक आणि संशयित भारतीय नागरिकांच्या प्रवासाच्या विशिष्ट पद्धतीवर डीआरआय अधिकाऱ्यांच्या पथकाने काळजीपूर्वक पाळत ठेवली होती. हे सोने मुंबईत एका विशिष्ट ठिकाणी पोहोचवले जाते. तिथे त्यावर प्रक्रिया करून मुंबई तसेच अन्य शहरांतील व्यापाऱ्यांना विकले जाते. विशेष म्हणजे हे सोने विकणाऱ्याला आणि विकत घेणाऱ्याला एक सिक्रेट कोड दिला जात असे. तो कोड सांगितल्यावर खात्री पटल्यावरच याचा व्यवहार होत असे.

सप्टेंबरमधील कारवाई : गुप्त माहितीच्या आधारावर डीआरआयने ऑपरेशन गोल्ड रश सुरू केले होते. या अंतर्गत मुंबई, पाटणा आणि दिल्ली येथे ६५.४६ किलो सोने जप्त करण्यात आले होते. ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या कारवाईंपैकी एक कारवाई होती. महसूल गुप्तचर संचालनालयाने जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 33 कोटी असल्याचे सांगितले जात होते. सोने तस्करीचे मायानगरी मुंबई हब चालली आहे. भिवंडी येथे 27 सप्टेंबरला छापा टाकण्यात आला होता. त्यामध्ये १०.१८ कोटी रुपये किंमतीची १९.९३ किलो वजनी १२० बिस्किटे जप्त करण्यात आली होती.

हेही वाचा : Two Wheeler Theft : पठ्ठ्याने चोरल्या डझनभर दुचाक्या; सीसीटीव्हीमुळे सापडला पोलिसांच्या तावडीत

Last Updated : Jan 25, 2023, 10:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.