ETV Bharat / state

Gold Smuggling News: डीआरआयची मोठी कारवाई: मुंबई विमानतळावर 10 कोटी रुपयांचे सोने केले जप्त; 18 सुदानी महिलेसह भारतीय महिलेला अटक - Gold Smuggling News

महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 18 सुदानी महिलांना तसेच एका भारतीय महिलेला 16.36 किलो सोन्याच्या धातूच्या पेस्ट स्वरूपात 10.16 कोटी रुपयांसह अटक केली, असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.

DRI Seized Gold
सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफाश
author img

By

Published : Apr 26, 2023, 7:36 AM IST

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर संबंधित आवारात केलेल्या झडतीत सुमारे 1.42 किलो सोने, 16 लाख रुपयांचे विदेशी चलन आणि 88 लाख रुपयांच्या भारतीय नोटा सापडल्या. त्या जप्त करण्यात आल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी युएईमधून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सिंडिकेटद्वारे पेस्ट स्वरूपात सोन्याची भारतात तस्करी केली जाणार असल्याचे विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे समजली होती.

सोन्याचे तुकडे आणि दागिने जप्त : डीआरआय अधिकार्‍यांनी शहरातील विमानतळावर पाळत ठेवली, असे अधिकाऱ्याने सांगितले. तीन फ्लाइट्समधून प्रवास करणार्‍या सिंडिकेटचा भाग असल्याचा संशय असलेल्या प्रवाशांना विमानतळावर डीआरआयच्या पथकाने ओळखले आणि त्यांना थांबवले. त्यांच्या शोधादरम्यान, डीआरआयने पेस्ट स्वरूपात 16.36 किलो सोने, सोन्याचे तुकडे आणि दागिने जप्त केले. त्याची एकत्रित किंमत 10.16 कोटी रुपये आहे, असे अधिकार्‍याने सांगितले.

समन्वय साधणाऱ्या भारतीय महिलेला अटक : तस्करीचे सोने घेऊन जाणाऱ्या सुदानमधील अठरा महिला आणि प्रवाशांच्या हालचालीत समन्वय साधणाऱ्या एका भारतीय महिलेला अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेले बहुतेक सोने त्यांच्या शरीरावर लपवून ठेवलेले आढळले. संशयित प्रवाश्यांकडून मौल्यवान धातू शोधणे अत्यंत कठीण असते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले की, पुढील चौकशी सुरू आहे.

मुंबई हे ट्रान्झिट हब : 22 एप्रिल रोजी मुंबई कस्मट विभागाने मोठी कारवाई केली होती. मुंबई विमानतळावरून मुंबई एअर कस्टम्सने तस्करी केलेले 1.60 कोटी रुपयांचे सोने जप्त केले होते. या प्रकरणी तीन भारतीय प्रवाशांना अटक करण्यात आली होती. 24 कॅरेट सोन्याचे तीन बार सीमाशुल्क विभागाने त्यांच्याकडून जप्त केले आहेत. विमानतळावरील बॅगेज ट्रॉलीखाली सोन्याचे बार चिकटवून चोरटे तस्करीचा प्रयत्न करत होते. मौल्यवान धातूंची मोठी बाजारपेठ असल्याने सोन्याच्या तस्करांसाठी कस्टम अधिकाऱ्यांनुसार, मुंबई हे ट्रान्झिट हब आहे.

हेही वाचा : Mumbai Airport Gold Smuggling : कस्टमची मोठी कारवाई; तस्करीचे 1.60 कोटी रुपयांचे सोने मुंबई विमानतळावर जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.