ETV Bharat / state

Shodhuya Song Released : नैराश्याने ग्रासलेल्या प्रत्येकाला उभारी देणारं ओजस जोशी यांचं ‘शोधूया’ गाणं! - ओजस जोशी यांचं शोधूया गाणं प्रदर्शित

नैराश्याने ग्रासलेल्या प्रत्येकाच्या मनाला उभारी देणारं (lift up everyone suffering from depression) ओजस जोशी (Dr Ojas Joshi) यांचं गाणं ‘शोधूया’ नुकतंच प्रदर्शित (song Shodhuya is released) झालंय. गाण्यातून झळकणारा उत्साह ताल धरायला भाग पाडतो. या गाण्याच्या माध्यमातून एक छानशी संगीत मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. Shodhuya Song Released

Shodhuya Song Released
ओजस जोशी यांचं शोधूया गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Dec 19, 2022, 8:19 PM IST

मुंबई : संगीतात खूप ताकद असते असे म्हणतात. संगीत मनाला शांत करू शकते आणि उभारीही देऊ शकते. किंबहुना निराश मनाला ते सकारात्मकता देऊ शकते. असेच नैराश्याने ग्रासलेल्या प्रत्येकाला उभारी देणारं (lift up everyone suffering from depression) ओजस जोशी यांचं (Dr Ojas Joshi) गाणं ‘शोधूया’ नुकतंच प्रदर्शित (song Shodhuya is released) झालंय. गाण्यातून झळकणारा उत्साह ताल धरायला भाग पाडतो. तसाच मनातील भाव-भावनांचा सूरही गाण्यातच सापडतो. आशेचा असाच सूर घेऊन गायक डॉ. ओजस जोशी ‘शोधूया’ हे नवं गाणं घेऊन आले आहेत. या गाण्याच्या माध्यमातून एक छानशी संगीत मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. Shodhuya Song Released

‘ओजस जोश’ या आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून ओजस यांनी वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी गाणी रसिकांसाठी आणली आहेत. आतापर्यंत तीन गाणी प्रदर्शित झाली असून 'शोधूया' हे चौथं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. आगामी काळात अजून चार गाणी करण्याचा त्यांचा मानस आहे. 'मनोरंजनापलीकडे संगीताच्या माध्यमातून जनजागृती करणे, या उद्देशाने मी ही गाणी केली असल्याचं', डॉ. ओजस जोशी सांगतात. हल्लीच्या पिढीला आवडतील अशी मराठी गाणी इलेक्ट्रॉनिक्स म्युझिक आणि ट्रान्सच्या माध्यमातून सादर करत आम्ही माझ्या ‘ओजस जोश’ या प्रकल्पातून भविष्यात वेगवेगळे प्रयोग करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संगीतकार सलील कुलकर्णी यांच्या हस्ते हे गाणं नुकतेच प्रकाशित करण्यात आले. 'शोधूया शोधूया आनंदाच्या वाटा' असे बोल असणारं हे गाणं नैराश्याने ग्रासलेल्या प्रत्येकाला उभारी देणारं असेल. या गाण्याचा अनोखा अंदाज आजच्या तरुणाईसाठी विशेष ठरेल, असा विश्वास गायक डॉ. ओजस जोशी व्यक्त करतात. ‘मनोरंजनाच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम होणं गरजेचं आहे. ते काम डॉ. ओजस जोशी हा युवा गायक आपल्या गाण्यांतून सातत्याने करत आहे. आपल्याकडे अशा अनेक समस्या आहेत, ज्याविषयी उघडपणे बोललं जात नाही, असे विषय मनोरंजनाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले जाऊ शकतात, ओजस ते सातत्याने करतो आहे. ही नक्कीच कौतुकास्पद आहे', असे मत संगीतकार सलील कुलकर्णी यांनी याप्रसंगी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, 'तरुणाईला दिशा देण्याचा ओजसचा हा प्रयत्न स्तुत्य असून, भविष्यात अजून चांगली गाणी तो करेल असा मला विश्वास आहे.' 'शोधूया' हे गाणं शिवानी गोखले यांनी लिहिले असूनच अमेय गुंडाळे यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे. Shodhuya Song Released

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.