ETV Bharat / state

दिलासादायक..! मुंबईतील चार विभागातील रुग्ण दुपटीचा दर 400 दिवसांच्या पार - मुंबई कोरोना रुग्ण डबलिंग रेट न्यूज

मे-जूनमध्ये 50 ते 100 दिवस असा असणारा मुंबईतील 24 विभागातील कोरोना रुग्ण दुपटीचा दर (डबलिंग रेट) आता चक्क 400 दिवसांच्या पार गेला आहे. यामुळे मुंबईतून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, असे दिसून येत आहे.

Doubling rate over 400 days in Mumbai 4 wards
दिलासादायक..! मुंबईतील चार विभागातील रुग्ण दुपटीचा दर 400 दिवसांच्या पार
author img

By

Published : Nov 16, 2020, 2:26 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होत असून कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमालीची घटत चालली आहे. त्यामुळेच मे-जूनमध्ये 50 ते 100 दिवस असा असणारा मुंबईतील 24 विभागातील रुग्ण दुपटीचा दर (डबलिंग रेट) आता चक्क 400 दिवसांच्या पार गेला आहे.

मुंबईतील 24 विभागापैकी तब्बल चार विभागातील दर 400 दिवसांच्या वर गेला असून ही अत्यंत दिलासादायक मानले जात आहे. तर त्याचवेळी 5 विभागातील रुग्ण दुपटीचा दर 300 दिवसांच्या वर असून 12 विभागात हा दर 200 दिवसांच्या वर आहे. तर 3 विभागात हा दर 100 दिवसांच्या वर आहे. तर महत्वाचे म्हणजे मुंबईचा रुग्ण दुपटीचा दर 225 वर गेला आहे. जेव्हा की जूनमध्ये हा दर केवळ 26 दिवसांवर होता. एकूणच रुग्ण कमी होत असल्याने आणि रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत असल्याने ही दिलासादायक बाब आहे. मात्र लस आल्याशिवाय आपली कोरोना पासून सुटका नाही असे म्हणत तज्ज्ञांनी सर्व नियमांचे पालन करत कोरोनाला असेच दूर ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

'ई' वॉर्डमधील रुग्ण दुपटीचा दर 482 दिवसांवर
मुंबई महानगर पालिकेच्या अधिकृत संकेत स्थळावरील माहितीनुसार 14 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत 2 लाख 69 हजार 130 रुग्ण आढळले आहेत. तर यातील 2 लाख 44 हजार 659 रुग्ण बरे झाले आहेत. तर 14 नोव्हेंबरपर्यंत 10 हजार 77 रुग्ण सक्रिय होते. त्याचवेळी 10 हजार 555 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महत्वाची आणि मुंबईकरांची चिंता कमी करणारी बातमी म्हणजे मुंबईचा रुग्ण दुपटीचा वेग 225 दिवसावर गेला आहे. तर मुंबईतील 24 पैकी तब्बल 4 विभागाचा रुग्ण दुपटीचा दर थेट 400 दिवसांच्या वर गेला आहे. यात ई विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. ई विभाग अर्थात भायखळा परिसरातील दर 482 दिवस इतका झाला असून इथे मागील काही दिवसांपासून हाताच्या बोटावर मोजता येतील इतके रुग्ण आढळत आहेत. तर ई विभागानंतर पी साऊथ विभागातील दर 466 दिवसांवर गेला आहे. सी विभाग अर्थात मरीन लाईन्स परिसरातील रुग्ण दुपटीचा दर 444 दिवस झाला आहे. तर जो मुंबईतील विभाग कॊरोना हॉटस्पॉट ठरला होता त्या जी नॉर्थ अर्थात धारावी-माहीम-दादरच्या विभागाचा दर ही 400 दिवसाच्या पार गेला आहे. या विभागाचा दर 428 दिवस असा आहे.

पाच विभागाचा दर 300 दिवसांच्यावर
चार विभागातील कोरोना रुग्ण 482 ते 428 दिवसांनी दुप्पट होत असताना 5 विभागात हा दर 300 दिवसांच्या वर गेला आहे. यात बी विभागातील दर 392 दिवस, जी साऊथमधील दर 353 दिवस, डी विभागाचा दर 335 दिवस, ए विभागाचा दर 319 दिवस आणि एस विभागाचा दर 305 दिवस असा आहे. या पाठोपाठ 12 विभागातील दर 200 दिवसांच्या वर आहे. आर नॉर्थ विभागाचा दर 287 दिवस, एम ईस्ट विभागाचा दर 283 दिवस, के ईस्टचा दर 272 दिवस, एफ नॉर्थचा दर 265 दिवस, पी नॉर्थचा दर 256 दिवस, टी विभागाचा दर 245 दिवस, एल विभागाचा दर 230 दिवस, एच ईस्ट विभागातील दर 229 दिवस, एन विभागाचा दर 226 दिवस, एम वेस्टचा 217 दिवस, आर-सी विभागाचा 209 तर के वेस्टचा दर 200 दिवस असा आहे. तर एच वेस्टचा दर 191 दिवस, पी साऊथ विभागाचा दर 179 दिवस आणि आर साउथचा दर 174 दिवस असा आहे.

पालिकेच्या विविध उपाययोजनाचे यश
एप्रिल ते ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत मुंबईत कोरोनाची प्रचंड दहशत होती. पण आता ऑक्टोबरपासून ही दहशत कमी होत गेली असून कोरोना रुग्णांची संख्या खुपच कमी होत चालली आहे. आता मुंबईत दिवसाला 700 पर्यंत रुग्ण आढळत आहेत. तर मुंबईतील 24 ही विभागातील रुग्ण दुपटीचा दर ही 174 ते 482 दिवसांवर गेला आहे. मुंबईचा दर हा 225 आहे. कधी काळी मुंबई म्हणजे भारतातील कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जात होते. तर मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीला घाबरून परप्रांतीय मुंबई सोडून गेल्याचे ही आपण पाहिले आहे. पण मुंबईकरांनी, पालिकेने आणि सरकारी-पालिका आरोग्य यंत्रणेने हार न मानता विविध उपाययोजना करत अखेर कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आणत 'करून दाखवले' आहे. ज्या ई विभागाचा रुग्ण दुपटीचा दर थेट 482 दिवस आहे त्या विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. मार्च-एप्रिल पासूनच आपण ट्रेस-टेस्टिंग-ट्रिटमेंट यावर भर दिला, रुग्णांच्या संपर्कात आलेल्याना क्वारंटाइन केले. त्यामुळे रुग्ण संख्या कमी होण्यास मदत झाली. तर मागील महिन्यात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत मोठ्या संख्येने हायरिस्क मध्ये येणाऱ्या नागरिकांना शोधून काढण्यात आले. त्यामुळे ही मोहीम अत्यंत उपयोगी ठरल्याचेही दगडखैर यांनी सांगितले. तर रुग्ण कमी झाले तरी कोरोना गेलेला नाही. आपल्याला कोरोनाची लस उपलब्ध होईपर्यंत काळजी घ्यायची आहे. त्यामुळे आम्ही आमचे क्वारंटाइन सेंटर बंद केले नसून दुर्दैवाने दुसरी लाट आली तर आम्ही त्याचा सामना करण्यासाठी तयार आहोत, असेही ते म्हणाले.

कोरोना धारावी नियंत्रणात
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असणाऱ्या धारावीत कोरोना शिरला आणि सगळ्याच्याच पोटात गोळा आला. कारण या दाट लोकवस्तीत कोरोना अधिक वाढून मुंबईतील परिस्थिती गंभीर होण्याची भीती व्यक्त झाली. पण पालिकेने अत्यंत योग्य प्रकारे परिस्थिती हाताळत आज धारावी नियंत्रणात आणली आहे. त्यामुळेच धारावीच्या जी नॉर्थ विभागाचा रुग्ण दुपटीचा दर 428 दिवसावर गेला आहे. विशेष म्हणजे धारावीतील कोरोना नियंत्रणाची दखल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून जागतिक आरोग्य संघटनेने ही या कामाचे वेळोवेळी कौतुक केले आहे. याविषयी बोलताना या विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी ही समाधान व्यक्त केले आहे. तर सुरुवातीपासून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला याचे यश दिले आहे.

हेही वाचा - राज्यातील प्रार्थना स्थळे झाली खुली; भाजपाकडून ढोल-ताशा वाजवत गुलाल उडवत जल्लोष

हेही वाचा - 'बीडची घटना मानवतेला काळिमा फासणारी, सरकारने कठोर कारवाई करावी'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.