मुंबई: संजय राऊत यांनी दोन ट्विट केली असून पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी "आयएनएस फसवणुक प्रकरण सोमैया बाप बेटे फरार है. ये दोनो मिल्खा सिंग से तेज भाग रहे हैं. भाग सोमैया भाग!!" ( Bhaag Somaiya Bhaag ) असे म्हटले आहे. तर, एका वृत्तपत्राचे कात्रण पोस्ट करत केलेल्या दुसऱ्या ट्विटमध्ये राऊत यांनी "तू इधर उधर की न बात कर, ये बता की काफिला कैसे लूटा? मुझे रहजनोसे गीला तो हैं, पर तेरी रहबरी का सवाल हैं..", असे म्हटले आहे.
सोमैया यांनी आयएनएस विक्रांतसाठी निधी संकलन मोहीम राबवली होती. जहाज वाचवण्यासाठी अनेकांनी सोमैया यांच्या मोहिमेत दानही दिले. सोमैया यांनी या कामासाठी 57 कोटींहून अधिक रुपयांचा निधी उभारला, मात्र, हा निधी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सचिवांच्या कार्यालयात जमा करण्याऐवजी त्यांनी निधीमध्ये भ्रष्टाचार केला, असा आरोप राऊत यांनी केला आहे.