ETV Bharat / state

विरोध करण्याचा अधिकार आहे, पण कोणाच्या मांडवात अडथळा आणू नका - फादर फ्रान्सिस दिब्रिटो - ख्रिस्ती मिशनरी

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर राज्यातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या विरोधात वाद सुरू केले. राज्यात मराठीमध्ये ख्रिस्ती मिशनरी आणि इतर साहित्यिकांनी मोठे साहित्य निर्माण केले आहे. मात्र, एका ख्रिश्चन लेखकाला संमेलनाचे अध्यक्ष पद मिळाल्यानंतर वेगळया दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो
author img

By

Published : Oct 1, 2019, 9:22 PM IST

मुंबई - प्रत्येकाला वाद करण्याचा अधिकार आहे, पण तो भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून झाला पाहिजे. आपल्या देशात लोकशाही आहे. त्यामुळे कोणालाही विरोध करण्याचा अधिकार आहे, परंतु कोणाच्या मांडवामध्ये अडथळा आणू नका, असे आवाहन ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केले आहे.

कोणाच्या मांडवात अडथळा आणू नका - फादर फ्रान्सिस दिब्रिटो

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर राज्यातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या विरोधात वाद सुरू केले. 'वाद करा, पण प्रथम संवाद करा. चर्चेतून प्रत्येक अडचणीचा मार्ग निघतो. यामुळे माझ्याविरोधात जे वाद निर्माण करत आहेत, त्या सर्व मित्रांना माझे आवाहन आहे की, आपण भेटून चर्चा करू', असे फादर दिब्रिटो म्हणाले. राज्यात मराठीमध्ये ख्रिस्ती मिशनरी आणि इतर साहित्यिकांनी मोठे साहित्य निर्माण केले आहे. मात्र, एका ख्रिश्चन लेखकाला संमेलनाचे अध्यक्ष पद मिळाल्यानंतर वेगळया दृष्टीकोनातून पाहिले जात आहे.

हेही वाचा - मागाठाणेतील शिवसेना भाजपचे अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर

धर्म हा स्वयंभू शक्ती असून अध्यात्माचा मार्ग आहे. जर कुणी राजकारणासाठी धर्माचा वापर करत असतील तर त्यांना धर्म पुढाऱ्यांनी ठणकावले पाहिजे. हिंदू प्रचारकांना युरोपमध्ये हिंदू धर्माचा प्रसार करण्याची मुभा आहे. रामकृष्ण मिशन युरोप मध्ये काम करत आहे. युरोपीयन लोक याचे स्वागत करत आहेत, असे फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सांगितले.

Intro:
विरोध करण्याचा अधिकार आहे, पण कोणाच्या मांडवात अडथळा आणू नका - फादर फ्रान्सिस दिब्रिटो

mh-mum-01-father-fransis-dibreto-121-7201153

(यााठी फीड mojo var पाठवले आहे)

मुंबई, ता. १ :

वादे वादे जायते तत्व बोधा, असे एक वचन आहे, वाद करण्याचे अधिकार आहेत, ते करा,पण तो भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून.आपल्या देशात लोकशाही आहे, त्यामुळे कोणाला विरोध करण्याचा अधिकार आहे, परंतु कोणाच्या मांडवामध्ये अडथळा आणू नका, असे नम्र आवाहन ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ' ई टीव्ही भारत ' शी बोलताना केले
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर राज्यातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या विरोधात वाद सुरू केले असून त्यावर विचारले असताना त्यांनी हे आवाहन केले.

ते म्हणाले की, वाद करा, पण प्रथम संवाद करा, आणि त्यात काही निघाले नाही तर बसून मित्रपणाने आणि भावाभावाप्रमाणे बसून चर्चा करा, त्यातून मार्ग निघेल. यामुळे माझ्याविरोधात जे वाद निर्माण करत आहेत, त्या सर्व मित्रांना माझे आवाहन आहे की, आपण भेटू या, मी तुमच्या घरी भोजनाला येईन. नसेल तर तुम्ही माझ्याकडे या.आपण प्रथम माणूस आहोत. आणि बाकी सगळे नंतर आहोत. आपल्या देशात लोकशाही आहे, त्यामुळे कोणाला विरोध करण्याचा अधिकार आहे, परंतु कोणाच्या मांडवामध्ये अडथळा आणू नका असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात मराठीत ख्रिस्ती मिशनरी आणि इतर साहित्यिकांनी मोठे साहित्य निर्माण केलेले आहे, परंतु आता आपल्याला संमेलनाचे अध्यक्ष पद मिळाल्यानंतर एक वेगळया दृष्टीकोनातून का पाहिले जात आहे, असे विचारले असता फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणाले की, ही गोष्ट दिलीप माजगावकर यांनी ओळखली होती, त्यांनी जे धर्माचे ग्रंथ आहेत ते सुबोधमधे छापण्याचे ठरवले होते. त्यांनी त्यात पहिला प्रकल्प हा गीता रहस्य हा घेतला होता. दुसरा माझ्याकडे आला.आमची चर्च हे अतिशय शिस्तबद्ध आहे. तरीदेखील त्यावेळेचे बिशपने सांगितले. धर्माविषयी लोकांच्या भावना या अशा विषयावर खूप संवेदनशील असतात. मी त्यांच्या भावनेला हात घालणार नाही, असे सांगून त्यावर मी पुष्पामधी पुष्प मोगरी अशा पद्धतीने लिहीन असे सांगून ते लिहिले आणि त्याला आमचे मुख्य गार्डीनल जे पोपच्या अष्ट मंडळात आहेत, त्यांनी त्याला प्रस्तावना दिली. आणि ते समोर आले असल्याची माहिती फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी दिली.

राजकारणात धर्माची सरमिसळ केली जाते, यावर विचारले असता ते म्हणाले,
कोणीही आपल्या धर्माचा वापर हा राजकारणासाठी करू नये. धर्म हा स्वयंभू अशी शक्ती आहे. तो एक अध्यात्माचा मार्ग आहे. आणि जगण्याचाही मार्ग आहे. त्याचे क्षेत्र इतकेच आहे. आणि जर कुणी धर्माचा वापर करत असतील तर त्यांना धर्म पुढाऱ्यांनी हे सांगितले पाहिजे की, असे करू नका. हिंदू प्रचारकांना युरोपमध्ये हिंदू धर्माचा प्रसार करण्याची मुभा आहे. रामकृष्ण मिशन युरोप मध्ये काम करत आहे. त्यांचे स्वागत होत आहे. परंतु धर्म हा राजकारणापासून अलिप्त राहिला पाहिजे. धर्माने आपली कधीही स्वतःहून राजकारणात आपली सरमिसळ होऊ देऊ नये. यासाठी प्रत्येक धर्मासाठी माझे म्हणणे आहे. चर्च, मशीद, मंदिरातून राजकारणाचा कधीही प्रचार व्हायला नको. या धर्माच्या ठिकाणी जी माणसे येतात, ते अध्यात्माच्या ओढीने येत असतात. ती इथे येताना थकलेले असतात भागलेले असतात. त्यांना तो शांतीचा मार्ग शोधण्यासाठी येत असतात. असेही फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणाले.

Body:विरोध करण्याचा अधिकार आहे, पण कोणाच्या मांडवात अडथळा आणू नका - फादर फ्रान्सिस दिब्रिटो
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.