ETV Bharat / state

'जमावबंदीला घाबरू नका, कोणतीही नवीन बंधन नाहीत' - aditya thackeray minister mumbai

मुंबईतील जमावबंदीला घाबरू नका, त्यात कोणतेही नवीन बंधने नाहीत, असे आवाहन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुंबईत आज मध्यरात्रीपासून दोन आठवड्यासाठी १४४ कलम लागू केले आहे.

aditya thackeray, minister
आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री
author img

By

Published : Sep 17, 2020, 10:18 PM IST

मुंबई - येथे कोरोनाच्या रुग्णसंख्येत सतत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत आज मध्यरात्रीपासून दोन आठवड्यासाठी १४४ कलम लागू केले आहे. त्यामुळे सर्वत्र शहरात भीतीची वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जमावबंदीला घाबरू नका, कोणतीही नवीन बंधन नाहीत असे म्हणत लोकांना आवाहन केले आहे.

  • NO need to PANIC

    The order issued under section 144 CrPC is only an extension of the previous order issued on 31st August.
    No new restrictions have been imposed by @MumbaiPolice .

    Please share and don’t panic. #Section144 #Mumbai

    — Aaditya Thackeray (@AUThackeray) September 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबईत ३० सप्टेंबरपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार आहे. जमावबंदीच्या काळात ४ पेक्षा जास्त लोकांना एकत्र बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने ३१ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसारच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्तांनी आज (गुरुवारी) संध्याकाळी त्याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यांना धीर देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले. त्यात ते म्हणाले की, पोलिसांनी जमाव बंदी लागू केली आहे. त्यात जास्त बंधने नाहीत. त्यामुळे लोकांनी जास्त दुःखी होऊ नये, घाबरू नये'. तसेच जमावबंदी म्हणजे लॉकडाऊन नाही, असेही पोलिसांनी आदेशात सांगितले आहे.

दरम्यान, या जमावबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा, शासकीय-निमशासकीय संस्था आणि त्यांच्याशी संबंधित संस्था, किराणा दुकाने, इत्यादी महत्त्वाच्या सेवा वगळण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.