मुंबई - डोंगरी भागात तीन मजली इमारत आज सकाळी कोसळली. ही इमारत ८० वर्ष जुनी होती. या इमारतीत १५ कुंटुबे राहत होती. सध्या मलबा हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. या दुर्घटनेतील जखमी व्यक्तींना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी एनडीआरएफ आणि पालिका प्रशासन मदत कार्य करत आहे. जे.जे. रुग्णालयात या दुर्घटनेतील व्यक्तींसाठी विशेष विभाग तयार करण्यात आला आहे.