मुंबई : गँगस्टर सोनू पठाणच्या विरोधात 10 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 7 गुन्हे मुंबई पोलिसात तर 3 गुन्हे एनसीबीमध्ये दाखल आहेत. सोनू हा अनेक प्रकरणात फरार आरोपी होता. सोनू 2021 मध्ये मध्यरात्री आपल्या मैत्रिणीला भेटायला येणार असल्याची माहिती समीर वानखेडे यांना मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी डोंगरी परिसरात सापळा रचून सोनू पठाणला अटक केली होती.
चिंकूच्या चौकशीत सोनू पठाणचे नाव : एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी डोंगरी परिसरात ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला होता. हा कारखाना चिंकू पठाण याच्याशी संबंधित होता. त्यावेळी चिंकू पठाण याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सोनू पठाणचेही नाव आल्यानंतर तो फरार झाला होता. अखेर त्याला मध्यरात्री अटक करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून एनसीबीचे अधिकारी त्याच्या मागावर होते.
आरिफ भुजवालाला केली अटक : ड्रग्ज फॅक्टरीचा मास्टरमाईंड आरिफ भुजवाला याला 2021 च्या जानेवारीत एनसीबीने अटक केली होती. अंडरवर्ल्ड माफिया करीम लालाचा नातेवाईक चिंकू पठाणला एनसीबीने आधी गजाआड केले होते. चिंकू पठाणच्या चौकशीत आरिफ भुजवाला आणि त्याच्या ड्रग्ज फॅक्टरीची माहिती समोर आली होती. त्यानंतर दाऊदच्या नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा असलेल्या भुजावालाला पकडण्याची योजना एनसीबीने आखली होती.
सिद्धू मुसावाला खून प्रकरण : सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी अटक केलेल्या कपिल पंडितची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस पटियाला येथील राजपुरा येथे पोहोचले होते. पंजाबी गायक सिद्धू मुसावाला खून प्रकरणात अटक करण्यात आलेला शार्प शूटर दीपक मुंडी आणि त्याच्या दोन अन्य गँगस्टर साथीदारांना राजपुरा येथे ठेवण्यात आले होते. त्यांची चौकशी करण्यासाठी पंजाबचे डीजीपी दाखल झाले असून मुंबई पोलीसही दाखल झाले होते.
महाराष्ट्र पोलिसांची कारवाई : धमकी मिळाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता सलमान खान, त्याचे वडील लेखक सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. सलमान, सलीम यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने लागलीच कारवाई केली. राज्य सरकारच्या गृह खात्याने सलमान खान, सलीम खान यांची सुरक्षा वाढवली असून त्यासंदर्भात अधिक तपास सुरू केला होता. दरम्यान पंजाब पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर रेकी केल्याचे सलमानला दोन वेळा मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक दिल्लीला जाऊन या आरोपींची चौकशी करणार आहे.
हेही वाचा : : NCP Question To Governor Koshyari : शिंदे-फडणवीस सरकार संविधानिक आहे का, राज्यपालांनी खुलासा करण्याची राष्ट्रवादीची मागणी