मुंबई : छोटा राजन टोळीचा हस्तक अबू सावंत याचे काल सिंगापूरहून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. तो दिल्लीत पोहोचताच सीबीआयने त्याला ताब्यात घेतले. आज त्याला ट्रायल न्यायालयात हजर केले गेले. या प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर त्याला 2 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
अबू सावंतच्या नावाने रेड कॉर्नर नोटीस होती : अबू सावंत याला सिंगापूरमधून भारतात प्रत्यार्पण करण्याचे प्रयत्न बऱ्याच वर्षांपासून सुरू होते. अखेर आता त्यात यश आले आहे. मुंबई पोलिसांनी फरार अबू सावंतचा मुंबईत आणि देशभरात ठिकाणी विविध शोध घेतला होता. त्याने अनेकदा पोलिसांना चुकवून मुंबईच्या बाहेर पलायन केले होते. काही काळानंतर तो देशाच्या बाहेर पळण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतरच पोलिसांनी ही बाब इंटरपोलला कळवली. इंटरपोलने त्याच्यावर नजर ठेवत अखेर त्याला अटक केली. त्याच्या नावाने रेड कॉर्नर नोटीस देखील जारी केली गेली होती. विविध देशांचे पोलीस त्याच्यावर पाळत ठेवत होते. अखेर आता त्याला सिंगापूरमधून भारतात आणण्यात भारतीय यंत्रणांना यश आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग आणि मुंबई गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत त्याला सिंगापूरमधून हद्दपार करून भारतात आणण्यात आले.
धमकावने, खंडणी मागणे हे आरोप आहेत : मुंबई पोलीस अबू सावंत याचा गेल्या 17 वर्षापासून शोध घेत होते. त्याने मुंबईच्या अनेक बिल्डरला धमकी देऊन त्यांच्याकडून खंडणी वसूल केली आहे. याशिवाय त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हेही नोंदवले गेले आहे. लोकांना धमकावणे तसेच त्यांचा माल जप्त करणे व त्यांच्याकडून पैसे उकळणे, अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद त्याच्या नावावर आहे. सावंत याने डॉन छोटा राजनच्या कंपनीचे मालमत्ता व्यवहार आणि वित्त हाताळणी पूर्णपणे ताब्यात घेतली होती. त्याच्यावर प्रामुख्याने धमकावणे, खंडणी आदी आरोप आहेत. मुंबईसह देशभरात ठिकठिकाणी मार्किंग करणे, बिल्डर्सला संपर्क करून धमकावणे, प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी उकळणे, हे सर्व काम सावंत याच्या मदतीने सुरू होते.
हेही वाचा : FIR against Actor Sahil Khan : जीममध्ये महिलेला धमकावणे पडले महागात; अभिनेता साहिल खानवर गुन्हा दाखल