ETV Bharat / state

Dominance Of Ajit Pawar Party: सर्वपक्षीय बैठकीच्या ठरावावरही दिसलं 'दादा' पक्षाचं वर्चस्व - अजित पवार पक्षाचं वर्चस्व

Dominance Of Ajit Pawar Party : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation Issue) राज्य सरकारने आज (बुधवारी) बोलावलेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीनंतर काही सकारात्मक ठराव घेण्यात आले. या ठरावावरसुद्धा राज्यातल्या राजकारणाची मोहर उमटली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने आपल्या पक्षासमोर "दादा" (Dada) असं लिहिल्यानं आता या "दादा" पक्षाची चर्चा सुरू झाली आहे.

Dominance Of Ajit Pawar Party
शरद पवार गट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2023, 8:21 PM IST

मुंबई Dominance Of Ajit Pawar Party : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे केलं होतं. (meeting of MLAs of all parties) या बैठकीला राज्यातील सत्ताधारी पक्षातील सर्वच घटक पक्ष, महाविकास आघाडीतील घटक पक्ष, विरोधी पक्ष तसेच राज्यातील लहान मोठ्या पक्षाच्या नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित होते. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते. तसंच अजित पवार (Ajit Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरेही बैठकीला हजर होते.

Dominance Of Ajit Pawar Party
नेत्यांनी स्वाक्षरी केलेले ठरावपत्रक

सहकार्य करण्याचं सर्व पक्षांचं मत : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं यावर सर्वच पक्षांचं एकमत झालं. त्यासाठी सर्वच पक्षांनी एकत्रित येऊन सहकार्य करण्याचं ठरवलं. यासाठी सर्वपक्षीय ठराव करण्यात आला. यावेळी ठरावाच्या पत्रावर सगळ्याच पक्षांचे प्रमुख, प्रदेशाध्यक्ष, प्रतिनिधी यांनी आपल्या पक्षाचं नाव आणि स्वाक्षरी केली आहे. ठरवाच्या पत्रात अनुक्रमांक, नाव, पक्ष आणि स्वाक्षरी अशा प्रकारचे रकाने करण्यात आले होते.

'दादा' पक्षाची चर्चा : पक्षाच्या रकान्यात 'दादा' आणि 'एनसीपी'चा उल्लेख दिसून आला. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या नावापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लिहून स्वाक्षरी केली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या नावापुढे पक्षाच्या रकान्यात 'दादा' लिहून स्वाक्षरी केली आहे.

पुण्याचे पालकमंत्री पद पुन्हा अजित पवारांकडे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिवसेना-भाजपासोबत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सामील झाल्यामुळे शिंदे आणि भाजपातील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यांना पालकमंत्री पदाचे स्वप्न पडू लागले होते. मात्र, इथेही अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री पद आपल्याकडे राखण्यात यश मिळवले. यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांची दादागिरी भाजपा आणि शिंदे गटाने पाहिली आहे. महायुती सरकारमध्ये अजित पवार गटाला देखील पालकमंत्री पदाच्या वाटपात झुकतं माप देण्यात आलं आहे. यापूर्वी तीन वेळा अजित पवार पुण्याचे पालक मंत्री राहिलेले होते.

माहितीतही प्रशासनात 'दादागिरी' : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची कायमच सत्तेत असो किंवा नसो प्रशासनावर पकड राहिली आहे. वेळेची शिस्त पालन करून कार्यक्रमापूर्वी किंवा विकास कामांना भेटी देण्याच्या वेळेआधी पोहोचण्याची सवय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे. त्यामुळे अनेक प्रशासकीय अधिकारी अजित पवारांच्या कार्यक्रमाला वेळेपूर्वी पोहोचण्याची धास्ती घेत असतात. महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर इतर मंत्र्यांच्या विभागाच्या बैठका घेऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दादागिरी सर्वच पक्षांनी पाहिली आहे.

हेही वाचा:

  1. Black Day : कर्नाटक सीमा भागात काळा दिन; उबाठा गटाचे शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांना सीमेवर रोखलं
  2. Abu Azmi Reaction : बैठकीला निमंत्रण नसलं तरी मराठा आरक्षणाला आमचंही समर्थन, अबू आजमी यांची माहिती
  3. Maratha Protest In Nagpur : नागपुरातही मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण; मुंडन करत सरकारचा निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.