ETV Bharat / state

Doctor's Chain Fast Mumbai : डॉक्टरांचे उद्यापासून मुंबईत साखळी उपोषण; अस्थायी सहायक प्राध्यापकांच्या सेवा नियमित करण्याची मागणी - Mumbai doctor chain fast from 17 january

राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ( Governement Medical College ) अस्थायी सहायक प्राध्यापक यांच्या सेवा नियमित कराव्यात, या मागणीसाठी उद्या १७ जानेवारीपासून मुंबईत साखळी उपोषण करण्यात येणार आहे. ( Doctor's Chain Fast in Mumbai from 17th January )

Doctor's Chain Fast Mumbai
डॉक्टरांचे उद्यापासून मुंबईत साखळी उपोषण
author img

By

Published : Jan 16, 2022, 7:56 PM IST

Updated : Jan 16, 2022, 8:36 PM IST

मुंबई - राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ( Governement Medical College ) अस्थायी सहायक प्राध्यापक यांच्या सेवा नियमित कराव्यात, या मागणीसाठी उद्या १७ जानेवारीपासून मुंबईत साखळी उपोषण करण्यात येणार आहे. ( Doctor's Chain Fast in Mumbai from 17th January ) या साखळी उपोषणात राज्यातील सर्व १८ वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक (डॉक्टर) सहभागी होणार आहेत. यापूर्वी कोरोना काळात उच्च वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख ( Minister for Medical Education Amit Deshmukh ) यांच्यासोबत चर्चा झाली. अडचणीच्या काळात शासनाला सर्व डॉक्टरांनी मदत केली. मात्र, शासनाने डॉक्टरांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. या सर्व घटनेची आठवण करून देण्यासाठी सर्व वैद्यकीय प्राध्यापक (डॉक्टर) साखळी उपोषणाला बसणार आहेत. ( Medical Doctor Professor Chain Fast )

राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे सचिव डॉ. समीर गोलावर याबाबत बोलताना

फक्त 'कोविड योद्धे' म्हणून सन्मान! -

संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान चालू असताना, आता तिसरी लाटदेखील महाराष्ट्रात आली आहे आणि त्यामुळे हजारो रुग्ण सध्या बाधित होत आहेत. या सर्व लाटांमध्ये अहोरात्र आपल्या कुटुंबाची, जीवाची पर्वा न करता महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय शिक्षक सेवा देत आहेत. त्याकरिता त्यांना 'कोविड योद्धे' म्हणून वारंवार गौरविण्यात येत आहे. मात्र, या सन्मानाशिवाय इतर काहीही या वैद्यकीय शिक्षकांच्या हाती पडले नाही. मुंबईतील ग्रांट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जे जे. रुग्णालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या सेंट. जॉर्ज, जिटी तसेच कामा रुग्णालयात काम करत असताना सध्या अनेक शिक्षक स्वतः या कोरोना आजाराचे शिकार झाले आहेत. मात्र, या गोष्टींशी शासनाला काही सोयरसुतक नाही, असेच दिसत आहे.

फक्त आश्वासन देऊन वेळकाढूपणा -

मागील कित्येक वर्षांपासून हे सर्व वैद्यकीय शिक्षक आपल्या रास्त मागण्यांसाठी सरकार दरबारी निवेदन देत आहेत. मात्र, त्यांच्या हाती आश्वासनाशिवाय दुसरे काहीच पडत नाही. २०१६ साली केंद्रात ७ वा वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र, आतापर्यंत वैद्यकीय शिक्षकांना या सातव्या आयोगात नमूद केलेले इतर भत्ते जे शासनाने निर्धारित केलेल्या समितीने देखील मान्य करून शिफारस केलेत ते मिळालेले नाहीत. त्यामुळे हे सर्व भत्ते पूर्वलक्षीत प्रभावाने मिळावेत ही, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेची मागणी आहे, असे या संघटनेचे सचिव डॉ. समीर गोलावर यांनी सांगितले आहे. तसेच कोरोनाच्या लाटेत सरकार इतर राज्यातून डॉक्टरांची भरती करते किंवा कंत्राटी तत्वावर शिक्षकांचे पद तात्पुरत्या काळासाठी भरते. मात्र, वर्षानुवर्षे या वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या अस्थायी सहायक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना मात्र नियमित करण्याचे फक्त आश्वासन देऊन वेळकाढूपणा करत आहेत. उच्च वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत यबाबत दोनदा चर्चा झाली. मात्र, फक्त आश्वासन देण्यात आले. ज्यामुळे अनेक डॉक्टरांनी राजीनामा देणे पसंत केले आहे.

हेही वाचा - लसीकरणाची वर्षपूर्ती, ९० टक्के लोकांचा पहिला डोस पूर्ण - आरोग्य मंत्री राजेश टोपे

आंदोलन अधिक तीव्र करणार -

या सर्व प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे पहिले पाऊल म्हणून जे. जे. रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शक पदाचा राजीनामा अधिष्ठात्यांकडे सुपूर्त केला आहे. ज्यात १३० हुन अधिक शिक्षकांचा समावेश आहे. अशाच प्रकारे राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षकांनीही राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे हे शिक्षक प्रबंधावर सही करणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एमडी/एमएस या परीक्षेस पात्र होता येणार नाही. ज्यामुळे शासनास उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या मार्गाने मिळणारे बंधपत्रित उमेदवार मिळणार नाहीत तसेच ज्या नवीन विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील त्यांनादेखील मार्गदर्शक उपलब्ध होणार नाहीत. या सर्व बाबींचा परिणाम होऊन मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण होईल जे शासनास या परिस्थितीत प्रतिकूल ठरेल. म्हणून जर लवकरात लवकर वैद्यकीय शिक्षणकांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मग हे आंदोलन तीव्र करावे लागेल, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

Last Updated : Jan 16, 2022, 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.