मुंबई - काल मराठा समाजातील नेत्यांनी राज्यपालांना भेटून महाराष्ट्रातील 2 ओबीसी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. हे चुकीचे आहे. या मागणीचा आम्ही निषेध करतो, असे म्हणत राज्यात रखडलेली पदभरती त्वरित सुरू करावी अन्यथा आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू. तसेच, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटवू नये, असे ओबीसी नेते व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
तसेच, मराठा समाजाचे नेते जाणीवपूर्वक तणाव निर्माण करत आहेत. ओबीसी राज्यकार्यकारिणीची बैठक 5 जानेवारीला होइल. वर्षभर काय चालणार आहे यावर त्यात चर्चा होईल. ओबीसी नेत्यांच्या पाठीशी ओबीसी समाज भक्कम आहे. तुम्हाला आमची ताकद रस्त्यावर उतरून दाखवावी लागेल. असे शेंडगे यांनी मराठा नेत्यांना म्हटले.
हेही वाचा - अनलॉकमध्ये मुंबईच्या ध्वनी प्रदूषणात वाढ