ETV Bharat / state

केईएम, नायरमध्ये १२ वर्षावरील मुलांच्या ‘ट्रायल’ला अद्याप परवानगी नाही - corona vaccine trial for children in mumbai update

महापालिकेने १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरण करण्याच्यादृष्टीने विचार केला आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाची ‘ट्रायल’ घेतली जाणार आहे. यासाठी पालिकेने आवश्यक असणारी संपूर्ण यंत्रणा तयार ठेवली आहे. परवानगीसाठी केंद्र सरकारला पत्रही दिले आहे.

केईएम, नायरमध्ये १२ वर्षावरील मुलांच्या ‘ट्रायल’ला अद्याप परवानगी नाही  

author img

By

Published : Jun 12, 2021, 8:21 PM IST

मुंबई - मुंबईमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु आहे. या मोहिमेंतर्गत १८ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यात लहान मुलांना अधिक धोका असल्याचे म्हटले जात आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरण करण्याच्यादृष्टीने विचार केला आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाची ‘ट्रायल’ घेतली जाणार आहे. यासाठी पालिकेने आवश्यक असणारी संपूर्ण यंत्रणा तयार ठेवली आहे. परवानगीसाठी केंद्र सरकारला पत्रही दिले आहे. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र त्याला अद्याप परवानगी मिळाली नसल्याचीही माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

केईएम, नायरमध्ये ट्रायल -

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. यामध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचे म्हटले जाते आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण करण्याच्यादृष्टीने मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आतापर्यंत सुमारे ३९ लाख ४७ हजार ४२२ डोस देण्यात आले आहेत. मात्र सध्या लसींचा तुटवडा असल्याने लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी पालिकेने दिवसाला एक लाखाहून जास्त लसीकरण करता येईल अशी व्यवस्थाही उभी केली आहे. विशेष म्हणजे पालिका दिवसाला एक लाख लसीकरणाचा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. सद्यस्थितीत सुमारे एक लाख लसींचे डोसही उपलब्ध आहेत. त्यामुळे पालिका मुंबईकरांचे लसीकरण लवकरच पूर्ण करेल, असा विश्वासही काकाणी यांनी व्यक्त केला. कोरोना रोखण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी पुरेसा लस उपलब्ध करण्यासाठी राज्य व पालिकेचा प्रयत्न सुरु आहे. तिस-या लाटेत लहान मुलांना धोका असल्याने १२ ते १८ वयोगटातील लसीकरणाची ट्रायल घेतली जाणार आहे. ही ट्रायल केईएम, नायर रुग्णालयात घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

इतक्या मुलांना झाला कोरोना -

मुंबईमध्ये ११ मार्च २०२० पासून ९ जून २०२१ पर्यंत कोरोनाच्या ७ लाख १३ हजार ७९० रुग्णांची नोंद झाली आहे. १५ हजार १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ० ते ९ वयोगटातील १२ हजार ४४६ बालकांना कोरोनाची लागण झाली असून २६ बालकांचा मृत्यू झाला आहे. तर १० ते १९ वयोगटातील ३१ हजार ८५९ मुलांना कोरोनची लागण झाली असून ४६ मुलांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.