मुंबई : दिवाळीसाठी फराळ, कंदील, लाईटिंगची सर्व व्यवस्था झाली असेल तर आता तुमच्या दिसण्याकडे जरा लक्ष द्या. कारण दिवाळीच्या गोंधळात तुम्ही नक्कीच तुमच्या सौदर्याकडे लक्ष दिले नसेल. कपड्यांची, ज्वेलरीची जुळवाजुळाव आता पासूनच करून ठेवा. नाहीत ऐनवेळेवर टेंशन वाढेल. काही सोप्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही अधिक दिवाळीत स्टायलिश लूक ( Diwali Stylish Look ) मिळवू शकता. कपड्याच्या रंगापासून ते त्यांच्या शैली आणि डिझाइनपर्यंत सणाच्या विशेष लूककडे लक्ष देण्याची गरज आहे.
दिवाळीत कपड्यांची निवड : उत्सवात आकर्षक दिसण्यासाठी कपड्यांची निवड अतिशय महत्त्वाचा भाग ( Diwali Dress Selection ) आहे. वेळ, पाहूणे, गर्दी पाहून उत्सवाचे मोल राखून कपड्यांची निवड केली पाहिजे. सणांमध्ये जास्त चमकदार कपडे घालणे हा ट्रेड आता जूणा झाला आहे. तुम्ही अगदी साधे कपडे घातले तरीही चांगेल दिसू शकता. मात्र ते योग्य रित्या परिधान करणे गरजेचे आहे. तुम्ही कपडे कसे हाताळता हे तुमच्यावर अवलंबून आहे.
दिवाळीत कपड्यांच्या रंगाची निवड : फ्रेश रंग नेहमी चांगेल दिसतात. यात गुलाबी पिवळे, लाल, केशरी रंगांचा समावेश ( Diwali Dress Color Selection ) होतो. ड्रेससोबतच प्रसंगानुसार कपड्यांचा रंगही निवडा. पिवळे, लाल, केशरी, गुलाबी रंगाचे कपडे दिवाळीनिमित्त अतिशय आकर्षक दिसतात. हे सर्व रंग पूजेतही शुभ मानले जातात. सणासुदीच्या रंगानुसार मुले शर्ट किंवा कुर्ताही कॅरी करू शकतात.
दिवाळीत हेअर स्टाईल : रोजच्या पेक्षा दिवाळीत वेगळे दिसावे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे दिवाळीत तुमच्या हेअरस्टाइलकडेही विशेष लक्ष ( Diwali Hair Style ) द्या. उत्तम केशरचनांचा अवलंब करून साधे पोशाख आकर्षक बनवता येतात. साडी घातली तर केस मोकळे सोडू नका, केस बन करू शकता. त्याला अंबाडा बोलतात. त्याशिवाय जर ड्रेस घातला असेल तर केस मोकळे ठेऊ शकता.
दिवाळीत ज्वेलरी : दिवाळीच्या निमित्ताने मुले आणि मुलीचे सुंदर पोशाख तसेच दागिने त्यांचे लुक वाढवू ( Diwali Jewellery ) शकतात. आज काल सोन्याला बगल देऊन ऑक्साईड रंग जास्त चालत आहे. महिला सोन्याला पाठ फिरवून डायमंड नेकलेस किंवा मोत्यांच्या दागिन्यांना पसंती देत आहेत. महिलांनी त्यांच्या कपड्यांना पूरक लूकमध्ये दागिन्यांचा समावेश करावा. यात बोटांमध्ये अंगठी, बांगड्या, बाजूबंध, कमरपट्टा असे जड किंवा हलके दागिने घाला.