ETV Bharat / state

'आपत्तीग्रस्तांना मोफत शिधावाटप करणार' - free ration to disaster victim decision

पूरग्रस्तांना मदत म्हणून शासनाकडून प्रती कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि ५ लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

chhagan bhujbal
छगन भुजबळ
author img

By

Published : Oct 20, 2020, 1:51 AM IST

मुंबई - राज्यातील विविध भागात परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे ज्यांचे घर पाण्याखाली बुडाले, काही ठिकाणी घरे वाहून गेलेली आहेत, अनेकांची शेती वाहून गेली आहे, अशा निराधार कुटुंबाना मोफत अन्नधान्य पुरवठा करणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. तर नुकसानग्रस्त भागांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार शरद पवार तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भेटी देत आहेत.

सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती, रस्ते वाहून गेले आहेत. काही घरे दोन-दोन दिवस पाण्याखाली होती. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून शासनाकडून प्रती कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि ५ लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे.

राज्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या आपत्तीग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्याबाबतच्या 8 मार्च 2019च्या (सीएलएस-२०१८/प्र.क्र.२२५/म-३) शासन निर्णयानुसार ही मदत देणार असल्याची माहिती, मंत्री भुजबळ यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.