मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्वपूर्ण बैठक आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पार पडली. यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच विधानसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत मनसेमध्ये दुमत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आज मनसेची बैठक पार पडली. विधानसभा निवडणूक लढवयाची कि नाही याबाबत राज ठाकरेंनी पक्षातील नेत्यांशी चर्चा केली. विधानसभा निवडणुकीबीबत राज ठाकरे लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.