ETV Bharat / state

Disabled Carried Second Floor : सरकारी अनास्था! लिफ्ट नसल्यानं दिव्यांग महिलेला दुसऱ्या मजल्यावर नेलं उचलून, अधिकाऱ्यांचा खाली येण्यास नकार - विराली मोदी

Disabled Carried Second Floor : राज्याच्या राजधानीत एका दिव्यांग महिलेसोबत अत्यंत संतापजनक प्रकार घडलाय. विराली मोदी नावाच्या महिलेनं दावा केला की, सरकारी कार्यालयात लिफ्ट नसल्यानं तिला लग्नाच्या कागदपत्रांवर सही घेण्यासाठी दोन मजले उचलून न्यावं लागलं. काय आहे हे प्रकरण, जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी...

Disabled Carried Second Floor
Disabled Carried Second Floor
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 4:20 PM IST

मुंबई Disabled Carried Second Floor : इमारतीत लिफ्ट नसल्यानं एका दिव्यांग महिलेला लग्नासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर उचलून न्यावं लागल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. विराली मोदी नावाच्या या महिलेनं सोमवारी (१६ ऑक्टोबर) 'X' वरील एका पोस्टमध्ये दावा केला की, निबंधक कार्यालयातील सरकारी अधिकारी कागदपत्रांवर तिच्या सह्या घेण्यासाठी तळमजल्यावर आले नाहीत.

अधिकारी स्वाक्षरीसाठी खाली आले नाहीत : ही घटना मुंबई उपनगरातील खार येथे घडली. 'मी दिव्यांग आहे. माझं लग्न १६/१०/२३ रोजी मुंबईतील खार रजिस्ट्रार ऑफिसमध्ये झालं. हे ऑफिस इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर होतं, जिथे जाण्यासाठी लिफ्टची सोय नव्हती. मात्र, अधिकारी स्वाक्षरीसाठी खाली आले नाहीत. त्यामुळे मला लग्न करण्यासाठी लागणाऱ्या सहीसाठी दोन मजले उचलून वर न्यावं लागलं', असं या महिलेनं 'X' वर लिहिलं.

अ‍ॅक्सेसिबल इंडिया मोहिमेचं काय झालं : 'पायऱ्या अतिशय उंच होत्या आणि रेलिंग सैल आणि गंजलेलं होतं. तिथे येण्यापूर्वी मी एजंटला माझ्या दिव्यांगत्वाची माहिती दिली होती. मात्र, तरीही कोणी मला मदत करण्याची ऑफर दिली नाही. त्यांनी माझ्यासाठी कोणत्याही प्रकारची सोय केली नव्हती, असा आरोप विरालीनं केला. अ‍ॅक्सेसिबल इंडिया मोहिमेचं काय झालं, असा सवाल तिनं महाराष्ट्र सरकार आणि केंद्राला केला आहे.

जबाबदार कोण : हे योग्य आहे का? 'अ‍ॅक्सेसिबल इंडिया' मोहिमेचं काय झालं? मी व्हीलचेअर वापरते म्हणून मला माझ्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्याचा अधिकार नाही का? जर कोणी घसरलं असतं किंवा मी माझ्या लग्नाच्या दिवशी पडली असती तर? याला जबाबदार कोण? असे गंंभीर प्रश्न विरालीनं उपस्थित केले आहेत. या प्रसंगामुळे निराश झाल्याचं तिनं सांगितलं.

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना टॅग केलं : 'माझ्या देशाचं सरकार आणि नागरिक दिव्यांगत्वाला सामावून घेऊ शकत नाहीत याबद्दल मी निराश झाली आहे. या घटनेमुळं माझा मानवतेवरील विश्वास उडालाय. दुसऱ्या मजल्यावर उचलून नेण्यासाठी मी काही सामान नाही. मी एक माणूस आहे आणि माझेही हक्क आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया विरालीनं व्यक्त केली. विरालीनं तिच्या या पोस्टमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यालय, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतरांना टॅग केलं आहे.

  • PLEASE RT!

    I am disabled and I got married at the Registrars Office at Khar Mumbai on 16/10/23. The office was on the 2nd floor WITHOUT a lift. They wouldn’t come downstairs for the signatures and I had to be carried up two flights of stairs to get married. pic.twitter.com/ZNCQF3gJRY

    — Virali Modi (@Virali01) October 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

  1. Same Sex Marriage : 'समलैगिंक विवाहाला मान्यता देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा फोल ठरली'
  2. Father Daughter Love : शेवटी बापाचंच काळीज; सासरी छळ होत असलेल्या मुलीला बापानं मिरवणूक काढून आणलं माहेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.