ETV Bharat / state

Vote From Home : लोकसभा निवडणूक 2024, ज्येष्ठांसह दिव्यांग नागरिकांना पहिल्यांदाच घरून करता येणार मतदान - election Commission Of India

आगामी निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरुन मतदान करता येणार आहे. त्यामुळे बेडवर असलेल्या ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Vote From Home
मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
author img

By

Published : Jun 2, 2023, 2:20 PM IST

मुंबई : देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने सर्वच पक्ष लोकसभेच्या तयारीला लागले आहेत. यावेळची लोकसभा निवडणूक 2024 ऐतिहासिक होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि 80 वर्षांहून अधिक वय असणाऱ्या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाकडून दिली जाणार. पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयोग लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

कसे असणार नियोजन : लोकसभा निवडणूक 2024 घोषणेनंतर 5 दिवसांच्या आत दिव्यांग आणि वृद्ध व्यक्तीच्या घरी जाऊन ‘१३ डी’ हा फॉर्म भरून घेतला जाईल. त्यानुसार टपाल मतपत्रिकांच्या छपाईची ऑर्डर दिली जाईल. यापूर्वी लोकसभेची पोटनिवडणूक आणि मुंबई महापालिकेच्या अंधेरी पोटनिवडणुकित असा प्रयोग करण्यात आला होता. यामुळे मतदारांच्या संख्येत १-२ टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणूक 2024 तयारी : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ११ जूनपर्यंत राज्यातील ११५ जणांना निवडणूक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हा आणि केंद्र स्तरावर हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जुलै महिन्यात निवडणुकीची केंद्र निश्चित करणे, मतपेट्यांची पहाणी, सीसीटिव्ही कॅमेरे बसवणे, मतपेट्या साठवणुकीच्या गोदामांची व्यवस्था, मतदान यंत्रांची चाचपणी, मृत मतदारांची नावे काढणे. राज्यातून कायमस्वरूपी बाहेर गेलेल्या नागरिकांची नाने कमी करणे, अशी सर्व कामे चालणार आहेत. 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मतदारांच्या पुनर्निरिक्षणाचा विशेष कार्यक्रम राबविला जाईल.

18 वर्ष पूर्ण करणारा तरुण करणार मतदान : 1 जानेवारी 2024 रोजी ज्याचे वय १८ वर्षे पूर्ण होत आहे, त्यांनाही मतदान करता येणार आहे. त्यासाठी मतदार सूचित नाव नोंदवण्याचे आवाहन श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. मतदान ओळख पत्रावरील खराब छायाचित्र असणाऱ्या मतदारांची ओळख पडताळणी मोहीम सुरु आहे. खराब छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्रातील 15 टक्के मतदार मृत झाले आहेत. त्यामुळे 80 वयाहून अधिक मतदारांच्या सर्वेक्षणाच्या वेळी मृत मतदारांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे मृत मतदारांची संख्येत ऐतिहासिक वाढ होऊ शकते. आतापर्यंतच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या देशाच्या इतिहासात मृत मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची ही पहिलीच वेळ ठरु शकते असेही ते म्हणाले. राज्यात एकूण ९६ लाख मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये कोणताही अपप्रकार घडू नये, यासाठी ६७ मतदान केंद्रांवर सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहितीही श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

एकमेव ठिकाणी छाईची निर्मिती : मतदानाच्या वेळी डाव्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते. ही शाई लगेच जात नाही. अशा प्रकारची शाई भारतात एकमात्र ठिकाणी म्हणजे कर्नाटक राज्यातील म्हैसूर येथे तयार केली जाते. म्हैसूर पेंटर या शासकीय आस्थापनामध्ये या शाईची निर्मिती होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी या आस्थापनातूनच शाईचा पुरवठा केला जात असल्याची माहितीही श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.

  1. लोकसभा २०१४ साली मतदार ८०७९८८२३ झालेले मतदान ४८७४०४०३ टक्केवारी ६०. ३२
  2. लोकसभा २०१९ साली मतदार ८८६७६९४६ झालेले मतदान ५४७४४०३८ टक्केवारी ६१.०२

निवडणूक प्रक्रियेत सहभागी होता येईल : आमच्या सारख्या दिव्यांगांना आगामी लोकसभा निवडणुकीत घरून मतदान करता येणार आहे. केंद्र सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला तर आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे या निर्णयाचे आम्ही स्वागतच करू. काही दिव्यांग बांधवांना मतदानाला जाताना अनेक अडचणी येतात, काही चालू शकत नाहीत. त्यांनाही आता निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवता येणार असल्याची माहिती दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बुऱ्हाण शेख यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.