मुंबई : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (North Maharashtra University) प्राध्यापक भरती प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी (Violation of UGC rules in recruitment process) शिक्षण संचालकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. २ नोव्हेम्बर अर्थात परवा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची चौकशी होणार आहे.
शासनाच्या निर्णयांचे उल्लंघन : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील १०५ कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक पदांच्या पदभरती युजीसी व महाराष्ट्र शासनाच्या निर्णयांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत राज्याचे शिक्षण संचालक कार्यालयाचे प्रशासन अधिकारी सुयश दुसाने यांनी तसे पत्र उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडे पाठविले आहे. २ नोव्हेम्बर रोजी त्याची चौकशी केली जाणार (Director of Higher Education will investigate) आहे.
पत्राची दखल : १८ जुलै २०२२ मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती केली गेली. १०५ पदांच्या भरतीसाठी सुमारे ५०० पेक्षा अधिक अर्ज महाराष्ट्रभरातून प्राप्त झाले होते. मात्र ह्या प्राध्यापकांच्या भरती करताना विद्यापीठ अनुदान आयोग तसेच भरती करतानाचे महाराष्ट्र शासनाचे नियम बाजूला ठेवले आणि व्यवस्थापन परिषदेला नियमबाह्य महत्व दिल्या गेल्याचा आरोप शिक्षण क्रांती संघटना यांनी केला आहे . तसे त्यांनी तसे पत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासन पुणे यांना देखील दिले. त्यांच्या ह्या पत्राची दखल शिक्षण संचालक धनराज माने यांनी घेतली. त्यांच्या कार्यालयाने १९ ऑक्टोम्बर २०२२ रोजी चौकशीचे आदेश दिले (Director of Higher Education will investigate) आहे.
नियमबाह्य प्रकरण : ह्या संदर्भात शिक्षणक्रांती संघटनेचे प्राध्यापक नितीन घोपे जे स्वतः तक्रारदार आहेत त्यांनी ह्या बाबत ईटीव्हीला सांगितले कि, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील १०५ कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक पदांच्या पदभरतीबाबत मुलखाती घेताना सहसंचालक-सहसंचालक प्रतिनिधी यांच्या अनुपस्थितीत ह्या मुलाखती घेतल्या. तसेच निवड प्रक्रियेत नेट, सेट पात्रता धारकांना डावलून फक्त पीएचडी उमेदवारांनाच पदभरतीमध्ये घेतले. तश्या नियुक्त्या जारी केल्या. हे नियमबाह्य प्रकरण आहे. तसेच आमच्या तक्रारीनंतर उच्च शिक्षण संचालक पुणे यांच्या कार्यालयाने उमविला पत्राद्वारे कळविले कि, ह्या प्रकरणी अडीच महिने झाले पत्रव्यवहार करूनही कोणतेही उत्तर दिले नसल्याने हि चौकशी २ नोव्हेम्बर २०२२ रोजी लावत असल्याचे त्यात म्हटले आहे .
नियमानुसार चौकशीसाठी हजर राहावे : शिक्षण संचालक कार्यालयाचे प्रशाकीय अधिकारी सुयश दुसाने यांनी दिनांक १९ ओक्टोम्बर रोजी सहसंचालक उच्च शिक्षण जळगाव संतोष चव्हाण याना लिहिलेल्या त्या पत्रात नमूद केले आहे कि, १७ जुलै २०२२ रोजी कुलगुरू प्रकुलगुरू याना प्राध्यापक नितीन घोपे यांनी ह्या संदर्भात अधिकृत पत्र लिहून कळवले आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने चौकशी त्वरित करायाला हवी होती. मात्र आपण काही एक कार्यवाही केली नाही . तर संतोष चव्हाण सह संचालक उच्च शिक्षण जळगाव यांनी २१ ओक्टोम्बर २०२२ रोजी कुलसचिव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव याना पत्राद्वारे कळविले आहे कि -उक्त कारणामुळे २ नोव्हेम्बर रोजी चौकशी कामी येत आहोत. नियमानुसार चौकशीसाठी हजर (investigation on November 2) राहावे.
प्रकरणाची चौकशी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे दिनांक १८ मे २०२२ रोजी जाहिरात क्रमांक - ०२/२०२२ नुसार १०५ कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी विद्यापीठाने जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीत वेतन/मानधन नेट, सेट ला २४००० रूपये, पीएचडीला ३००००रूपये आणि पीएचडी अधिक पाच वर्ष अनुभव असणाऱ्यांना ३५००० रूपये प्रतिमाह मानधन नमूद केले. हा भेदभाव केल्यामुळे दिनांक २० मे २०२२ रोजी विद्यापीठ अनुदान आयोग, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ आणि महाराष्ट्र शासन यांच्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याचा संदर्भ देत प्राध्यापक नितीन घोपे यांनी निवेदन दिले होते. आता या सर्व प्रकरणाची चौकशी २ नोव्हेंबर रोजी होईल आणि त्यातून सत्य काय आहे ते बाहेर येईल. दरम्यान उमविचे रजिस्टर विनोद पाटील याना विचारले असता , त्यांना ह्या संदर्भात परिपूर्ण कल्पना नाही, असे त्यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना (Director of Higher Education)सांगितले.