ETV Bharat / state

Mumbai San Francisco Direct Flight : आता महाराष्ट्र जोडला जाणार सिलिकॉन व्हॅलीशी! मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवा सुरु

मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेमुळे (Mumbai San Francisco Direct Flight) महाराष्ट्रातील औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. थेट सेवेमुळे अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली मुंबई, पुणे शहराला जोडली जाणार असून त्याचा महाराष्ट्रातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा लाभ होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. (Direct flight from Mumbai to San Francisco).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 15, 2022, 5:42 PM IST

मुंबई : एअर इंडियाच्या मुंबई ते सॅनफ्रान्सिस्को थेट विमानसेवेचा शुभारंभ (Direct flight from Mumbai to San Francisco) केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंदीया (Minister of Civil Aviation Jyotiraditya Scindia) यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबई विमानतळावर एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्बेल विल्सन यांच्या हस्ते प्रवाशांना बोर्डींग पासचे वितरण करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून या सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी केंद्रीय नागरी विमान उड्डाण विभागाचे सचिव राजीव बन्सल देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून या सोहळ्यात सहभागी झाले

थेट विमान सेवा पर्यटकांना फायदेशीर : मुंबई येथून सुरू झालेली ही थेट विमान सेवा आतापर्यंतची सर्वांत लांब हवाई सेवा आहे. सध्या आठवड्यातून तीन वेळा चालू असणारी ही सेवा नंतर दररोज सुरू होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. सॅनफ्रान्सिस्को शहर हे मोठे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र असून ही थेट विमान सेवा भारतीय पर्यटकांना फायदेशीर ठरणार आहे. या थेट सेवेने पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. कोरोना नंतर आता आंतरराष्ट्रीय प्रवास पुर्ववत होतो आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चोवीस तासात दीड लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबईसह महाराष्ट्रातील लाखो लोक अमेरिकेत स्थायिक असून या सगळ्यांना हवाईसेवेच्या माध्यमातून जोडणाऱ्या एअर इंडियाशी त्यांचे वेगळ नाते निर्माण झाले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जी 20 मुळे राज्याला ब्रॅंडींगची संधी : महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला जी 20 परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. पंतप्रधानांमुळे महाराष्ट्राला देखील जी 20 परिषदेच्या बैठकांचा मान मिळाल्याने राज्याच्या ब्रॅंडींगची संधी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. तसेच नुकतेच आम्ही राज्यात ७० हजार कोटींच्या गुंतवणूकीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली असून विमानतळ विस्ताराला प्राधान्य दिले आहे. राज्यात प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड करणार असून त्या माध्यमातून हवाईसेवा जोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

हवाईसेवेत भारतात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन : गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र आवडते ठिकाण असून थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एअर इंडियाने युरोप आणि अमेरिकेतील महत्वाच्या शहरांना जोडण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. केंद्रीय मंत्री सिंदिया यांनी मराठीतून भाषणाला सुरूवात केली. मुंबई आणि सॅनफ्रान्सिस्कोशी असलेल्या भावनिक नात्याची आठवण त्यांनी सांगितली. हवाईसेवेच्या क्षेत्रात भारतात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असल्याचे सांगत जगात भारत हे नागरी हवाई उड्डाण क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाचा देश असून हवाईप्रवासाला अधिक बळ देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.