मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी साठी आलेल्या दीपाली सय्यद यांनी सांगितले की, त्या शनिवारपर्यंत शिंदे गटात प्रवेश करतील. मुख्यमंत्री देतील ती जबाबदारी स्वीकारणार आहे. दीपाली यानी यावेळी रश्मी ठाकरे संजय राऊत, निलम गोऱ्हे सुषमा अंधारे यांच्यावरही टीका केली. त्या म्हणाल्या की, मुंबई पालिकेतील खोके मातोश्रीवर येणे बंद झाल्याचे रश्मी ठाकरेंना दु:ख झाले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर अनेक जण शिंदे गटात दाखल होत आहेत.
दिपाली म्हणाल्या येत्या तीन दिवसात मी शिंदे गटात प्रवेश करणार आहे. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहे. ते माझ्यावर जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारण्यास तयार आहे. शनिवार पर्यंत मी शिंदे गटात प्रवेश करेल. मुंबई महानगरपालिकेचे खोके वेळेवर मातोश्रीवर पोहचत नाहीत याची खंत रश्मी वहीनींना जाणवत आहे. खोके येणे बंद झाल्या मुळे त्यांना दु:ख झाल्याची टीकाही त्यांनी केली आहे. शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे, सुशमा अंधारे या चिल्लर आहेत असे सांगच. मुख्य सुत्रधार रश्मी वहीनी असल्याचे सांगत त्यांनी जहरी टीका केली.
शिंदे गट आणि ठाकरेंना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, समोरून सहकार्य मिळाले नाही. शिंदेनी मला राजकारणात आणले. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याची सध्या गरज असल्याने मी शिंदे गटात जात आहे, असेही दिपाली यांनी म्हणले आहे. ठाकरेंची साथ सोडण्यामागेचे कारण देताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. राऊतांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली असून तोंडाने पक्ष कसा फोडायचा याचे उत्तम उदाहरण राऊत असल्याचे त्यांनी म्हणले आहे.