ETV Bharat / state

Hijab Ban Case : दिलीप वळसे पाटील यांचे हिजाब मुद्यावर शांती राखण्याचे आवाहन - हिजाब प्रकरणावर जयंत पाटलांची भूमिका

कर्नाटकमध्ये झालेल्या हिजाब प्रकरणाचे पडसाद (The repercussions of the hijab issue) आता देशभर उमटताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिजाब मुद्यावर शांती राखण्याचे आवाहन केले आहे.

दिलीप वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील
author img

By

Published : Feb 11, 2022, 1:40 PM IST

Updated : Feb 11, 2022, 4:10 PM IST

मुंबई: कर्नाटकमध्ये झालेल्या हिजाब प्रकरणाचे पडसाद आता देशभर उमटताना दिसत आहेत. याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटताना दिसत आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हिजाब मुद्यावर शांती (Dilip Walse Patil appeals on hijab issue) राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच राज्याचे गृहमंत्री म्हणाले, आंदोलन करण्याची परवानगी कोणालाही नाही. त्यामुळे सर्वांनी शांतता ठेवावी. त्याचबरोबर ज्या ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. त्या ठिकाणी पोलिसांनी पूर्ण लक्ष ठेवलेलं आहे.

दिलीप वळसे पाटील यांचे हिजाब मुद्यावर शांती राखण्याचे आवाहन

मागील काही दिवसांपासून हिजाब मुद्द्यावरून कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्राच्या ही काही भागांमध्ये आंदोलनं केली जात आहेत. त्या सर्व भागात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) म्हणाले, धर्मगुरूंनी आपल्या लोकांना शांती ठेवण्याचं आवाहन केलं पाहिजे. त्याचबोरबर राजकीय नेत्यांनीही या मुद्द्यावर राजकारण करू नये.

  • On #HijabRow protests in Malegaon, Maharashtra Home Minister Dilip Walse Patil says, "First of all, it isn't allowed to protest anywhere, if someone does, do it peacefully. I appeal to political parties not to instigate &for everyone to maintain peace, cooperate with the police." pic.twitter.com/8mCDDnIM8o

    — ANI (@ANI) February 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कर्नाटक मध्ये सुरु असलेल्या हिजाबच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात देखील राजकीय वातावरण तापू लागले आहे. कर्नाटकातून हिजाबचा मुद्दा आता महाराष्ट्रात पसरायला सुरुवात झाली असून, राज्यात मालेगाव सहित इतर काही भागांमध्ये हिजाबच्या मुद्द्यावरून आंदोलन केली जात आहेत. मात्र सर्वांनी शांतता राखली पाहिजे. राजकीय नेत्यांनी या मुद्द्यावर राजकारण करू नये. परराज्यातील मुद्यावरून राज्यात आंदोलन करून शांतता बिघडवू नका, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्व राजकीय नेत्यांना केला आहे.

तसेच जातीजातीमध्ये किंवा धर्म धर्मामध्ये संघर्ष निर्माण झाल्यास समाजाची शांतता बिघडते. त्यामुळे हिजाब सारख्या मुद्द्यावरून नागरिकांनी आंदोलन करू नये. असं आवाहन गृहमंत्र्यांनी मुंबईत त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे. तसेच आंदोलन करण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. जिथे हिजाबच्या मुद्द्यावरून आंदोलन होऊ शकतात, त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्यासची यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितले.

  • Maharashtra| A case has been registered against the organizers for the protest that took place in Malegaon, yesterday. Notices have been sent to the people involved. #HijabRow matter is pending in the High Court, so no one should disturb law & order: Sachin Patil, SP Nashik Rural pic.twitter.com/shDOVzQeU1

कुणी कुठला वेश परिधान करायचा हा त्याचा अधिकार - जयंत पाटील

कुणी काय परिधान करायचं हा त्याचा त्याचा अधिकार आहे. भारतीय राज्यघटनेने सर्वांना तो अधिकार दिला आहे, अशी भूमिका राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पुण्यात बोलताना मांडली आहे. कर्नाटकात झालेल्या हिजाब प्रकरणावरून जयंत पाटील यांनी आपली भूमिका (Jayant Pati role on hijab issue) स्पष्ट करताना, कर्नाटकात जे काही चालू आहे ते मुद्दाम केलं जातं आहे. काही तरी वेगळे विषय बाहेर काढायचे आणि मूळ विषय भटकावयचे अशी टीका देखील जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केली आहे.

मुख्यमंत्री त्या प्रवृत्तीचे नाहीत -

पुणे पालिकेत काही दिवसांपूर्वी झालेल्या गोंधळामुळे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच मला मारण्याचे आदेश दिले होते, असा आरोप केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री हे त्या प्रवृत्तीचे नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर असले आरोप करण चुकीचं असल्याचं देखील जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. देशात अनेक ठिकाणी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. जिथे आपली सत्ता नाही. तिथल्या सरकारला टार्गेट केलं जातं आहे आणि हे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे, अशी टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) त्यांनी केली आहे.

Last Updated : Feb 11, 2022, 4:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.