मुंबई : व्हॅलेंटाईन डे'ला अवघा एक दिवस शिल्लक आहे. तुम्हाला जर व्हॅलेंटाईन डे साठी तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीला काही खास गिफ्ट द्यायचे असेल तर, आज आम्ही तुम्हाला काही खास गिफ्टचे प्रकार सांगणार आहोत. प्रियकर, प्रेयसी किंवा आपले खास व्यक्ती, प्रेमाची व्यक्ती यांना बर्थडे सोडून तुम्ही इतरवेळी गिफ्ट देत नसाल तर तुमच्यासाठी मस्त संधी आहे. व्हॅलेनटाईन डेला गिफ्ट देऊन पार्टनर अथवा प्रेमाच्या व्यक्तीला खूश करू शकता. गिफ्ट देणे म्हणजे नेहमीच खर्च करायला हवा असे नाही. कमीतकमी पैश्यात गिफ्ट घेऊन सुद्धा तुम्ही तुमच्या व्हेलेंटाईनला खूश करू शकता. अनेकदा तुम्ही पाहीले असेल लाल रंगाचे वेगवेगळे कपडे, भेटवस्तू किंवा ग्रीटिंग कार्डस व्हॅलेंटाईन डे निमित्त बाजारात असतात. जर तुम्हाला जास्त खर्च करायचा नसेल तर दैनंदिन वापरातील वस्तु सुद्धा तुम्ही तुमच्या व्हेलेंटाईनला देऊ शकता.
ग्रीटिंग कार्डलाही मागणी: सध्या व्हाट्सअप आणि सोशल मीडियाच्या दुनियेत देखील ग्रीटिंग कार्डचे महत्व कमी झालेले नाही. बाजारात पन्नास रुपयांपासून ते आठ हजार रुपयांपर्यंतचे व्हॅलेंटाईन डे साठी ग्रीटिंग कार्ड उपलब्ध आहेत. म्युझिकल ग्रीटिंग कार्डची किंमत हजारांच्या घरात आहे. तरी देखील त्याला मागणी असल्याचे दुकानदाराने सांगितले आहे. दहा रुपयांपासून ते आठ हजार रुपयांपर्यंत भेट वस्तू उपलब्ध आहेत. व्हॅलेंटाईन डे करता प्रेमाच्या व्यक्तीला भेटवस्तू देण्यासाठी बाजार विविध प्रकारच्या गिफ्टने फुलली आहे.
कमी किंमतीत भेटवस्तू उपलब्ध: चर्चगेट येथील आर्चीजच्या दुकानात चक्क दहा रुपयांपासून ते आठ हजारांपर्यंत भेटवस्तू उपलब्ध आहेत. दहा रुपयांना आर्टिफिशियल गुलाब फुल हे कमीत कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे म्युझिकल शोपीस, किचैन वॉच, कपल शॉपीस आणि 99 रुपयाच्या टेडी बियर पासून ते 6000 रुपयांच्या टेडी बियरपर्यंत वरायटी या दुकानात पाहायला मिळेल. किचैन वॉच हे काहीतरी वेगळे असे केवळ तीनशे रुपयांना उपलब्ध आहे. तसेच 99 रुपयात हार्ट शेपचा पत्र्याचा लाल रंगाचा डबा आकर्षक गिफ्ट आहे. हा रिकामा डबा तुम्ही काहीही ठेवण्यासाठी वापरू शकता. आर्टिफिशियल पुष्पगुच्छ देखील उपलब्ध आहेत. ग्रीटिंग कार्ड साठ रुपयांपासून ते आठ हजार रुपयांपर्यंत तुम्ही या दुकानात खरेदी करू शकता.
हेही वाचा: Kiss Day 2023 किस डे ला अनुभवा स्वर्गीय चुंबनाची जादु पण कशी मग वाचा सविस्तर