मुंबई - मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या काही गटांकडून गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेत लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. या जाहीर केलेल्या उमेदवारीवर मराठा क्रांती मोर्चाचेच नेते आबा पाटील यांनी आक्षेप दर्शवला आहे. मराठा क्रांती मोर्चा ही समाजाच्या आरक्षणासाठी हक्कासाठी, न्यायासाठी लढणारी चळवळ आहे. मराठा क्रांती मोर्चाला राजकीय व्यासपीठावर आणून नये, ज्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे त्यांचा मराठा समाजाशी काही संबध नाही असेही पाटील म्हणाले.
मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी ज्यांनी स्वयं उमेदवारी घोषित केली आहे. त्या उमेदवारांचा मराठा समाजातील लोकांशी काहीही चर्चा केलेली नाही, असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. थेट कोणताही जाहीर झालेल्या उमेदवारीशी मराठा समाज व ठोक मराठा क्रांती संघटनांचा काही संबध नाही, असे यावेळी सांगण्यात आले.
या परिषदेत मराठा आरक्षण हा महत्त्वाचा विषय असल्याचे सांगण्यात आले. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना १० लाखांची मदत आणि नोकरी द्यावी, व लवकरात लवकर समाजाचा मागण्या मान्य कराव्या, यासाठी काम करणाऱ्या लोकांना आम्ही ठोक मराठा क्रांती मोर्चा व समाज पाठींबा देईल, असे आबा पाटील यांनी सांगितले.