मुंबई : आपल्या मागण्यांसाठी पालिका मार्डचे डॉक्टर ( Mard Doctors withdraw Their Strike ) पुन्हा गिरीश महाजन यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांकडे आता आपले गाऱ्हाणे मांडणार ( See Detailed Report on This ) आहेत. यामुळे संप मागे घेऊन पालिका मार्डला मिळाले काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १४३२ जागांची पदनिर्मितीला लवकरच मान्यता मिळणार ( Mard Doctors of Municipal Hospital ) आहे. वसतिगृहाचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राकडे निधी मागितला जाणार आहे. तसेच, सीएसआर फंडाचासुद्धा वापर केला जाणार आहे. तसेच प्रश्न सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाला दोन दिवसांची मुदत दिली आहे. त्यात प्रश्न सुटले नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका प्रशासन यांच्यात बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.
निवासी डॉक्टरांनी घेतला संप मागे त्यानंतर पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे, अशी माहिती डॉ. प्रवीण ढगे यांनी दिली. मंगळवारी सकाळी जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत संपातून माघार घेणार नाही, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, रात्री वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर कोणतेही लेखी आश्वासन दिले नसले, तरी बैठकीच्या मिनिटची प्रत मिळणार आहे. या अटीवर संप मागे घेण्यात आला आहे.
आयुक्तांनी एका मिनिटात बाहेर काढले मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत बैठकीदरम्यान पालिका रुग्णालयातील डॉक्टरांचा कोविड भत्ता, महागाई भत्ता तसेच वसतिगृहाचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर आज भेट देऊन बैठक घेण्याचे निर्देश महाजन यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांना दिले. त्यानुसार आज मार्डचे डॉक्टर पालिका आयुक्तांना भेटण्यास गेले असता त्यांचा कोविड भत्याचा प्रश्न सुटला आहे.
अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांना भेटण्यास सांगितले बाकीच्या मागण्यांसाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांना भेटण्यास सांगितले. संजीवकुमार यांच्याकडे डॉक्टर्स गेले असता तेथेही त्यांना न्याय मिळालेला नाही. यामुळे संप मागे घेऊन पालिका निवासी डॉक्टरांची कोविड भत्त्याची एकाच मागणी मान्य झाली आहे. इतर मागण्यांसाठी आता पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे जावे लागणार आहे. यामुळे संप मागे घेऊन मिळाले काय असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे.
या मागण्यांसाठी डॉक्टरांचा संप वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १४३२ जागांची पदनिर्मिती, वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील वसतिगृहांची दुरवस्था, सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यपकांची अपुरे पदे तातडीने भरावीत, महापालिका आणि सर्व शासकीय रुग्णालयात महागाई भत्ता आणि थकबाकी तात्काळ द्यावी. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करण्याच्या मागणीसाठी मार्डने काल सोमवार २ जानेवारीपासून संप पुकारला होता. या संपात महापालिकेच्या २ हजार निवासी डॉक्टरांसह राज्यातील एकूण ७ हजार निवासी संपात सहभागी झाले होते.
रुग्णांचेच हाल मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर आणि कूपर या चार रुग्णालयातील २ हजार निवासी डॉक्टर संपावर गेले होते. त्यामुळे ओपीडी सेवेवर परिणाम झाला होता. वॉर्डमधील डॉक्टर सेवेवरही परिणाम झाला होता. डॉक्टर संपावर असल्याने काही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यामुळे या संपात रुग्णांचेच हाल हाल झाले. मात्र पालिकेने संपाचा मोठा परिणाम झाला नसल्याचे म्हटले आहे.