ETV Bharat / state

सिंगापूरच्या धर्तीवर धारावीचा विकास; अदानी समुहाकडून 'धारावी मास्टर प्लॅन'ची संकल्पना सादर होणार - धारावी मास्टर प्लॅन

Dharavi Master Plan: धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (डीआरपीपीएल) जगप्रसिद्ध शहर आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील नियोजनकार तसेच तज्ज्ञांना आपल्या महत्त्वाकांक्षी धारावी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी केले आहे. (Dharavi Redevelopment Project) त्यामुळे आता आशियातील सर्वांत मोठ्या धारावी वसाहतीच्या पुनर्प्रकल्पात मोठी झेप असल्याचा दावा अदानी समुहाकडून करण्यात आाला आहे. (DRPPL)

Dharavi Master Plan
धारावी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 4:25 PM IST

मुंबई Dharavi Master Plan : धारावी पुनर्वसन प्रकल्पाबाबत डीआरपीपीएल कंपनीने मोठी घोषणा केली आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर तसेच सासाकी ही रचनाकार फर्म आणि बुरो हॅपोल्ड या सल्लागार कंपनीसोबत डीआरपीपीएल भागीदारी करणार आहे. (Adani Group) सिंगापूरमधील तज्ज्ञ देखील या प्रकल्पात सहभागी झाले असून हे सर्व धारावीच्या रहिवाशांसाठी जागतिक हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्या सहभागामुळे डीआरपीपीएलची सामाजिक जबाबदारी आणि नाविन्यपूर्ण रचनेसाठीचा प्रयत्न स्पष्ट होत असल्याचे कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मकरंद गाडगीळ यांनी सांगितले.

सासाकी कंपनीला 70 वर्षांचा अनुभव: डीआरपीपीएलने या प्रकल्पासाठी अमेरिकेतील सासाकी ही प्रसिद्ध रचना फर्म आणि बुरो हॅपोल्ड ही ब्रिटनमधील प्रसिद्ध सल्लागार कंपनी यांना सोबत घेतले आहे. या दोन्ही कंपन्या शहर नियोजन आणि पायाभूत अभियांत्रिकीसाठी प्रसिद्ध आहेत. सासाकी कंपनीला ७० वर्षांचा जागतिक अनुभव बुरो हॅपोल्ड शहरांची पर्यावरणीय आणि सामाजिक ओळख अबाधित ठेवून तेथे सर्जनशील आणि मूल्याधारित पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करण्यासाठी ओळखले जातात. अदानी समूहाने धारावीसाठी स्वतंत्र शौचालये, हवेशीर स्वयंपाकघर असलेल्या परिपूर्ण घरांची निर्मिती करण्याचे ठरवले आहे व्यावसायिक आणि नोकरीच्या संधीची निर्मिती आणि स्थानिक समुदायाची उन्नती असे एक वास्तवात येणारे नवजागरणाचे स्वप्न पहिले असल्याचे गाडगीळ यांचे म्हणणे आहे.

नागरिकांचे राहणीमान उंचावण्याचे उद्दिष्ट्य: डीआरपीपीएलच्या प्रवक्त्याने सांगितले की, धारावी पुनर्विकास प्रकल्प हा केवळ शहरी नूतनीकरण आणि पायाभूत सुविधांचे पुनरुज्जीवन एवढाच नसून त्यापेक्षा अधिक आहे. धारावीतील संस्कृतीचा गाभा जोपासतानाच तेथील रहिवाशांचे जीवनमान उंचावण्याचे उद्दिष्ट आहे. आमच्या जागतिक दर्जाच्या भागीदारांचे कौशल्य आणि धारावीकरांचा उत्साह, चैतन्य यांच्यातील सुसंवादातून धारावीच्या नागरी पुनर्विकासाचे जगाचे लक्ष वेधून घेईल असे मॉडेल विकसित करू असा दावाही त्यांनी केला.

सिंगापूरच्या धर्तीवर धारावीचा विकास: १९६९ मध्ये स्थापन झालेल्या सिंगापूर गृहविकास मंडळाने १२ लाख घरांची उभारणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यातून जागतिक दर्जाच्या एकात्मिक पायाभूत सुविधांची निर्मिती झाली. यातून मिळालेल्या अनमोल कौशल्य आणि अनुभवांचा उपयोग करून त्यांचा समावेश आपल्या परिवर्तनीय प्रक्रियेत करण्याचे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या धारावीसारख्याच झोपड्या, झोपडपट्ट्या आणि वस्ती असे १९६०च्या दशकात सिंगापूरचे चित्र होते. मात्र, सिंगापूर गृहविकास मंडळाने तेथे १२ लाख घरे उभारली आहेत. गेल्या पाच दशकांच्या कालावधीत, सिंगापूरच्या शहरी पुनरुज्जीवनाचा अनुभव गाठीशी असलेल्या व्यावसायिकांकडे जे ज्ञानाचे भांडार आहे त्याचा उपयोग धारावी पुनर्विकास प्रकल्पात होईल, असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा:

  1. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन रामदास आठवलेंची मोठी मागणी, आरपीआयसाठी मागितल्या 'इतक्या' जागा
  2. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शक्तिशाली भूकंपानं हादरला जपान, त्सुनामीचाही दिला इशारा
  3. उत्तर भारतात धुक्याचा कहर; दिल्लीहून महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे 10-12 तास उशिरा, प्रवाशांचे हाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.