ETV Bharat / state

धारावीकरांनी पुन्हा करून दाखवलं; दुसऱ्या लाटेत चौथ्यांदा, तर आतापर्यंत दहा वेळा शून्य रुग्णांची नोंद - Dharavi corona Ajay Devgan twit

धारावीकरांनी पुन्हा करून दाखवलं आहे. धारावीत दुसऱ्या लाटेत चौथ्यांदा, आतापर्यंत दहाव्यांदा शून्य कोरोना रुग्ण आढळले आहेत. धारावीत सध्या २२ सक्रिय रुग्ण आहेत. अभिनेता अजय देवगणनेही ट्विट करून आनंद व्यक्त केला होता.

dharavi
dharavi
author img

By

Published : Jul 4, 2021, 8:22 PM IST

मुंबई - मुंबईमधील धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीत कोरोना विषाणूचा प्रसार झाल्याने गेल्यावर्षी ती हॉटस्पॉट बनली होती. मात्र, याच धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रविवारी (4 जुलै) चौथ्यांदा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत धारावीत 10 वेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, धारावीत सध्या २२ सक्रिय रुग्ण आहेत.

जे होऊ नये तेच झाले -

मागील वर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाने शिरकाव केला. त्यानंतर जे होऊ नये, ज्याची भीती होती, तेच झाले. धारावीसारख्या दाटीवाटीची झोपडपट्टीही कोरोना हॉटस्पॉट ठरली. १ एप्रिल 2020 रोजी धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. जुलै-ऑगस्टनंतर धारावीत रुग्णसंख्या घटत गेली. त्यानंतर दोन अंकी असलेली रोजची रुग्णसंख्या एकवर आली. अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली.

धारावीत 10 वेळा शून्य रुग्ण -

२४ डिसेंबर २०२० रोजी पहिल्यांदा, २२ जानेवारी २०२१ रोजी दुसर्‍यांदा, २६ जानेवारीला तिसर्‍यांदा, २७ जानेवारीला चौथ्यांदा, ३१ जानेवारीला पाचव्यांदा, २ फेब्रुवारीला सहाव्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. या लाटेदरम्यान धारावीतही रुग्णसंख्या वाढली होती. मात्र, धारावीकरांनी पुन्हा करून दाखवलं. धारावीत १४ जून, १५ जून, २३ जूनला एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आज ४ जुलैला पुन्हा धारावीत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे धारावीत आतापर्यंत 10 वेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीत ६ हजार ९०१ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ६ हजार ५२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या २२ सक्रिय रुग्ण आहेत.

धारावी मॉडेल -

१ एप्रिल २०२० रोजी धारावीत पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. दाटीवाटीने वसलेल्या धारावीला कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक होण्याचा धोका होता. रुग्णसंख्या वाढू लागल्याने एकावेळी धारावी 'कोरोना हॉटस्पॉट' बनली होती. मात्र, पालिकेने संपूर्ण यंत्रणा राबवून विविध उपाययोजना सुरू केल्या. कोरोना रोखण्यासाठी 'धारावी पॅटर्न' राबवण्यात आला. ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग हे ४ टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ; यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आले, अशी माहिती सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. धारावीत राबवण्यात आलेल्या मॉडेलची चर्चा देशभरात करण्यात आली. तसेच हे मॉडेल अनेकठिकाणी राबवण्यात आले आहे.

अजय देवगणलाही आनंद

धारावीत यापूर्वीही 9 वेळा शून्य रुग्णसंख्या आढळली. त्यामुळे अनेकांनी आनंद व्यक्त केला. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणनेही यापूर्वी धारावीत शून्य रुग्णसंख्या आढळल्याने आनंद व्यक्त केला होता. याबाबतचे ट्विट अजयने केले होते. तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही धारावीकरांचे अनेकदा कौतुक केले आहे.

धारावीत नेमक्या काय केल्या जात आहेत उपाययोजना

मुंबई महापालिकेद्वारे माझं कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. या अंतर्गत नागरिकांची आरोग्य तापसणी केली जात आहे. कोरोना चाचण्या सातत्याने केल्या जात आहेत. लोकांच्या संपर्कात येणाऱ्या दुकानदार, फेरीवाले, हॉटेल कर्मचारी, फुल मार्केट व्यापारी यांच्या कोरोना टेस्ट केल्या जात आहेत.

हेही वाचा - वसई-विरारमध्ये पेड लसीकरण ड्राइव्ह; १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.