ETV Bharat / state

आता शिफारस नको, हातात एसटीचे प्रमाणपत्र द्या ; धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मागणी - bjp

सरकारने आमच्या तोंडाला नेहमी पानेच पुसली आहेत. आमच्या हिताचा निर्णय घेतला नाही तर सरकारला पायउतार करु असा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.

धनगर शिष्टमंडळासमवेत उद्धव आणि मुख्यमंत्री
author img

By

Published : Feb 21, 2019, 11:40 PM IST

मुंबई - सरकारने आतापर्यंत आमच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केली. आता आम्हाला शिफारस नको, धनगरांच्या पोरांच्या हातात एसटीचे प्रमाणपत्र द्या, अशी थेट मागणी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने आज केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिष्टमंडळाचे सदस्य माध्यमांशी बोलत होते.

धनगर आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांची शिष्टमंडळाशी भेट झाली. राज्याचे महाधिवक्ता यांचे मत विचारात घेऊन पुन्हा बैठक घेण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यामुळे कुठलाच ठोस निर्णय या बैठकीत झाला नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा वर्षा बंगल्यावर गेले होते. पण, ही बैठक निष्फळ झाल्याचे दिसत आहे.

सरकारने मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते. पण, त्यानंतर यावर कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे धनगर समाजाचे नेते आता आक्रमक पावित्रा घेण्याच्या तयारीत आहेत. सरकारने आमच्या हिताचा निर्णय घेतला नाही, तर त्यांनी सत्तेतून पायउतार व्हावे असा इशारा शिष्टमंडळाच्या सदस्यांनी यावेळी दिला.

येत्या २७ तारखेला याच मुद्यावर महाड ते मुंबई असा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे शिष्टमंडळाने जाहीर केले. धनगर समाजामुळे भाजपला २०१४ ला विजय मिळाला. हा विजय २०१९ ला रोखू असे, शिष्टमंडळाचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

undefined

Intro:Body:

आता शिफारस नको, हातात एसटीचे प्रमाणपत्र द्या ; धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची मागणी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.