ETV Bharat / state

'मैं, मेरी तन्हाई और कॅमेरामन', धनंजय मुंडेंनी उडवली मोदींची खिल्ली - kedarnath

'मैं, मेरी तन्हाई और कॅमेरामन' असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे. तसेच निवडणुकींच्या निकालानंतर देशाला यांच्यापासून मुक्ती मिळो इतकीच प्रार्थना, असेही मुंडे म्हणाले.

नंजय मुंडेंनी उडवली मोदींची खिल्ली
author img

By

Published : May 19, 2019, 1:07 PM IST

मुंबई - 'मैं, मेरी तन्हाई और कॅमेरामन' असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली आहे. ज्ञानसाधनाही इतक्या थाटामाटात करतात हे मोदी साहेबांमुळे जगाला कळलं असणार. निवडणुकींच्या निकालानंतर देशाला यांच्यापासून मुक्ती मिळो इतकीच प्रार्थना, असेही मुंडे म्हणाले.

नरेंद्र मोदींच्या उत्तराखंड दौऱ्यावर सर्वच राजकीय पक्षांनी टीका केली आहे. धनंजय मुंडेंनीही मोदींवर निशाणा साधताना 'मैं, मेरी तन्हाई और कॅमेरामन' असे म्हटले आहे. निवडणूक प्रचार संपल्यानंतर नरेंद्र मोदी हे केदारनाथ आणि बद्रीनाथच्या यात्रेवर आहेत. यावेळी मोदींनी जवळपास १७ ते १८ तास केदारनाथमध्ये एका गुफेमध्ये ध्यानधारणा केली.

मोदींविरोधात तृणमूलची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मोदींच्या केदारनाथ दौऱ्याचे प्रसार माध्यमांवर प्रक्षेपण करण्यात आले असून, हे आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे म्हणत, तृणमूल काँग्रेसने पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांच्या या दौऱ्याला प्रसारमाध्यमांमधून मोठी प्रसिद्धी देण्यात आली आहे.

Intro:Body:

state 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.