ETV Bharat / state

रुग्णालयाबाहेर झालेले मुंबईतील हजार मृत्यू का दडवले? देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईत ज्या रुग्णांचा मृत्यू रुग्णालयाबाहेर झालेला आहे, असे मृत्यू अद्यापही आकडेवारीत दाखवण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्या बाबतीत वॉर्ड अधिकारी किंवा तत्सम प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले आहे. तरीही हा आकडा अजून जाहीर करण्यात आलेला नाही. मिळालेल्या माहितीप्रमाणे गेल्या तीन-साडेतीन महिन्यात असे किमान एक हजार मृत्यू मुंबईत झाले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांनी एक पत्र पाठवले आहे.

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे
author img

By

Published : Jun 25, 2020, 7:42 PM IST

मुंबई - रुग्णालयाबाहेर झालेले मात्र, विविध प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले सुमारे एक हजार मृत्यू अद्याप अधिकृत आकडेवारीत दाखवण्यात आलेले नाहीत. आकडेवारीची अचूकता हाच कोरोनाविरोधातील लढाईसाठी विश्लेषणाचा मुख्य आधार आहे. त्यामुळे याकडे काटेकोरपणे लक्ष द्यावे, असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांनी एक पत्र पाठवले आहे.

मुंबईत ज्या रूग्णांचा मृत्यू रूग्णालयाबाहेर झालेला आहे, असे मृत्यू अद्यापही आकडेवारीत दाखवण्यात आलेले नाहीत. या मृत्यूंच्या बाबतीत वॉर्ड अधिकारी किंवा तत्सम प्राधिकरणांनी मृत्यू प्रमाणपत्र दिलेले आहे. तरीही हा आकडा अजून जाहीर करण्यात आलेला नाही. मिळालेल्या माहितीप्रमाणे गेल्या तीन-साडेतीन महिन्यात असे किमान एक हजार मृत्यू मुंबईत झाले आहेत. प्राथमिक माहिती संकलनातच आत्तापर्यंत किमान 450 मृत्यू ओळखण्यात आलेले आहेत. एकूणच मृतांच्या संख्येत त्याच दिवशी किंवा 72 तासांत नवीन नोंद होणे आवश्यक आहे. मात्र, तीन महिने लोटले तरी रुग्णालयाबाहेरील मृतांची नोंद झाली नाही. हे मृत्यू लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा एकदम संख्या दिसू नये, या भीतीने रोज थोडे-थोडे करून त्यांचा यादीत समावेश करणे ही अतिशय चुकीची रणनीती आहे, असे फडणवीस यांनी पत्रात लिहिले आहे.

कोरोनाविरूद्धच्या लढाईत कोणत्या आठवड्यात किती मृत्यू झाले? किती रूग्णसंख्या आढळली? संसर्ग किती प्रमाणात झाले आहे, हे कळण्यासाठी आकडेवारी हा अतिशय महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. अचूक विश्लेषणाचा तो महत्त्वपूर्ण आधार आहे. या विश्लेषणातूनच उपाययोजना आखून कोरोनाला पायबंद घालणे शक्य आहे. त्यामुळे नोंदी अचूक ठेवण्याचा आग्रह सातत्याने असला पाहिजे. माझी आपल्याला नम्र विनंती आहे की, ही विलंबाची पद्धत बंद करून अचूक आकडेवारी हाती येईल आणि त्याचे तत्काळ रिपोर्टिंग होईल, याचा आग्रह आपण धरला पाहिजे. त्यादिशेने योग्य त्या सूचना आपण संबंधितांना द्याल, हा विश्वास वाटतो, असे फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

असेच एक पत्र 15 जूनला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. कोरोनामुळे झालेले सुमारे 950 मृत्यू त्यावेळी दाखवण्यात आलेले नव्हते. त्यानंतर 16 जूनला मुंबईत 868 आणि मुंबईसह राज्यात एकूण 1 हजार 328 मृत्यू अधिकचे दाखवण्यात आले. मुंबईत या 868 च्या व्यतिरिक्त सुमारे 350 जुने मृत्यू दरम्यानच्या काळात यादीत टाकण्यात आले होते. म्हणजेच असे एकूण १ हजार २०० पेक्षा अधिक जूने मृत्यू एकट्या मुंबईतून दाखवण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.