ETV Bharat / state

Devendra Fadnavis Uddhav Thackeray : मुकेश अंबानींच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंनी लावली हजेरी - Devendra Fadnavis

Devendra Fadnavis Uddhav Thackeray : उद्योगपती मुकेश अंबानी आणि पत्नी नीता अंबानी यांनी गणेश चतुर्थीनिमित्त त्यांच्या निवासस्थानी भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला अनेक बॉलीवूड सेलीब्रेटींसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनीही हजेरी लावली.

Devendra Fadnavis Uddhav Thackeray
Devendra Fadnavis Uddhav Thackeray
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 11:08 AM IST

मुंबई : मंगळवारी (१९ सप्टेंबर) गणेश चतुर्थीच्या निमित्तानं उद्योगपती मुकेश अंबानी आणि पत्नी नीता अंबानी यांनी मुंबईतील 'अँटिलिया' या त्यांच्या निवासस्थानी भव्य सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला बॉलीवूडमधील अनेक दिग्गज स्टार्स आणि सेलिब्रेटींनी हजेरी लावली.

या सेलिब्रेटींनी हजेरी लावली : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान कुटुंबियांसह 'अँटिलिया'ला पोहचला. त्याच्या व्यतिरिक्त पॉवर कपल रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण, सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन व मुलगी आराध्या बच्चन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि पत्नी कियारा अडवाणी, आलिया भट्ट, विकी कौशल, आयुष्मान खुराना, श्रद्धा कपूर, मनीष मल्होत्रा, जुही चावला, रितेश आणि जेनेलिया देशमुख या बॉलिवूड सेलिब्रिटींही या कार्यक्रमाला हजेरी लावली. पाहुण्यांची यादी एवढ्यावरच थांबत नाही. या कार्यक्रमाला अभिनेत्री अनन्या पांडे, दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर, क्रिकेटर केएल राहुल आणि अथिया शेट्टी हेमामालिनी, रश्मीका मंधाना, रेखा, बोनी कपूर, जितेंद्र हे देखील उपस्थित होते.

महाराष्ट्रातील या दोन राजकारण्यांची उपस्थिती : मात्र या कार्यक्रमाला दोन राजकारण्यांची उपस्थिती आता चर्चेचा विषय ठरली आहे. मुकेश अंबानींनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हजेरी लावली. गेल्या तीन वर्षातील राज्यातील सत्तानाट्यामुळं सध्या भाजपा आणि शिवसेनेचे संबंध पार टोकाला पोहचले आहेत. या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळं आता अंबानींच्या कार्यक्रमाला या दोघांनीही हजेरी लावल्यानं वेगवेगळ्या चर्चांना ऊत आलाय.

  • #WATCH महाराष्ट्र: महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणेश चतुर्थी समारोह में शामिल होने के लिए मुंबई में मुकेश अंबानी के आवास 'एंटीलिया' पहुंचे। #GaneshChaturthi2023 pic.twitter.com/UfIMGksejZ

    — ANI_HindiNews (@AHindinews) September 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरवर्षी अनेक सेलीब्रेटींची उपस्थिती असते : मुकेश अंबांनी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी गणेश चतुर्थी सोहळ्याला दरवर्षी अनेक बॉलीवूड सेलिब्रेटी आणि राजकारण्यांची उपस्थिती असते. यंदाही या सेलीब्रेटींच्या उपस्थितीनं हा सोहळा संस्मरणीय आणि तारांकित बनला होता.

हेही वाचा :

  1. Ganesh Festival 2023: महाराष्ट्र सदनात गणरायाची आरती; 'बाप्पा महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव'- भगतसिंग कोश्यारी
  2. Ganesh Chaturthi 2023: आलिया भट्ट, कार्तिक आर्यन, अनन्या पांडेसह सेलेब्रिटींनी दिल्या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा
  3. Ganesh Festival Celebration of Celebrities: पाहा 'या' सेलिब्रेटींच्या घरी झालंय गणपती बाप्पाचं आगमन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.