ETV Bharat / state

Devendra Fadnavis on Alka Lamba : 'हा तर पवार साहेबांचा अपमान' असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस नेत्याला फटकारले - insult sharad Pawar

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरून देशात राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी उद्योजकांचे खच्चीकरण करू नये, अशी भूमिका मांडल्यानंतर काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी, पवारांवर ट्विटरवरून टीकास्त्र सोडले.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Apr 9, 2023, 2:52 PM IST

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा पवार साहेब यांचा अपमान असल्याचे सांगत काँग्रेस नेत्याच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. फडणवीस यांनी पवारांची बाजू घेतल्याने राजकीय वर्तुळात आता उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.

  • Politics will come and go but this Tweet by a Congress leader on their long standing ally of 35 years and one of the India’s senior most political leaders and a 4 time CM of Maharashtra is appalling.@RahulGandhi is perverting India’s political culture ❗️ pic.twitter.com/84olg5FYOc

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अदानी ग्रुपमधील निनावी शेअर्सची चौकशी करावी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उद्योगपती अदानी यांच्याविरोधात शंख फुंकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गांधी यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. संसदेत यावरुन मोठा गदारोळ झाला होता. काँग्रेसने अदानी ग्रुपमधील निनावी शेअर्सची चौकशी करावी, अशी मागणी लावून धरल्याने संसदेत तीव्र पडसाद उमटले होते. दरम्यान, गांधी यांची खासदारकी रद्द केली.

शरद पवार यांनी अदानीची पाठराखण केली : अदानीच्या मुद्द्यांवर राहुल गांधी यांनी सरकारला जेरीस आणल्याने डरपोक सरकारने गांधींना निलंबित केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला होता. हा वाद तापला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानीची पाठराखण करताना, उद्योजकांना टार्गेट करू नका. त्यांचे खच्चीकरण होऊ देऊ नका कारण, उद्योजकांचे योगदान नाकारता येणार नाही, अशी भूमिका मांडली होती.

फडणवीसांनी पवार यांची बाजू घेतल्याने चर्चा रंगली : काँग्रेसच्या महिला नेत्या अलका लांबा यांनी शरद पवार आणि गौतम अदानी यांचा फोटो ट्विट करत काही भ्रष्ट नेते अदानीला पाठीशी घालत आहे. परंतु, राहुल गांधी एकटे जनतेची लढाई लढत असल्याचे सांगत पवारांवर टीकास्त्र सोडले. लांबा यांच्या टीकेला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून नव्हे तर चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. राजकारण आपआपल्या जागी असते आणि ते होत ही राहते. मात्र राजकारणातील सर्वात ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते. दीर्घकाळचे सहयोगी आणि महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीबद्दल अशी विधाने घातक आहेत. राहुल गांधी भारताची प्रगल्भ राजकीय संस्कृती नष्ट करायचे काम करत आहेत. फडणवीसांनी पवार यांची बाजू घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचे फड रंगले आहेत.

हेही वाचा : Rapper Umesh Khade News : राज्यात आणखी दुसरा रॅपर अडचणीत, ठाण्यापाठोपाठ मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.