ETV Bharat / state

Devendra Fadnavis: पवार करतात ती मुत्सद्देगिरी, मग शिंदेंनी केल्यावर का झोंबते? देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडून जनसंघाबरोबर घरोबा केला होता. पवारांची ती खेळी म्हणजे मुत्सद्येगिरी आणि त्यापेक्षा अधिक मेरीटवर केलेली शिंदेंची खेळी का मुत्सद्येगिरी नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारत शरद पवार यांना पुन्हा एकदा जोरदार टोला लगावला आहे.

Devendra Fadnavis vs sharad pawar
देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
author img

By

Published : Jun 26, 2023, 9:16 PM IST

माहिती देताना देवेंद्र फडणवीस

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी 1978 मध्ये काँग्रेसचे सरकार पाडत जनसंघासोबत घरोबा केला. काँग्रेस मधून 40 आमदारांसोबत बाहेर पडलेले शरद पवार यांच्या त्या खेळीला मुत्सद्देगिरी म्हणायचे आणि त्यापेक्षा अधिक मेरीटवर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या खेळीला म्हणायचे नाही, हा दुटप्पीपणा का एवढेच फक्त आपण विचारले होते. त्यावेळेस मी प्राथमिक शाळेत होतो की, जन्माला यायचा होतो. याचा काहीही संबंध नाही असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 1978 च्या राजकीय खेळीचा उल्लेख केल्यानंतर शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी प्राथमिक शाळेत होते. अशी टिप्पणी केली होती, त्याला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.

तेव्हा जनसंघासोबत कसे : काँग्रेस मधून बाहेर पडून 1978 मध्ये सरकार स्थापन करताना जनसंघाचा पाठिंबा पवारांनी घेतला. आता तर आम्ही युतीमध्ये एकत्र लढलो होतो त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी अतिशय मेरीटवर राजकीय चाल केली आहे. त्यामुळे त्यांच्या या खेळीला दोष कसा दिला जाऊ शकतो, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादीचा ओबीसी दिखाऊपणा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी समाजाला प्रदेशाध्यक्ष पद मिळावे अशी आता मागणी होत आहे. ही मागणी समोर आल्यानंतर आपण फक्त या मागणीबाबत उच्चार केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ ओबीसी समाजाबद्दल दिखाऊपणा केला जातो. जेव्हा संविधानिक पदे देण्याची वेळ येते तेव्हा मात्र ओबीसी समाजाला बाजूला केले जाते. हा आजपर्यंतचा इतिहास असल्याची टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली आहे.

हेही वाचा -

  1. Devendra Fadnavis : बघूच आता शवासन कुणाला करावे लागते; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार
  2. Sharad Pawar on KCR Maharashtra Visit : केसीआर यांच्याकडून राजकीयदृष्ट्या वेगळे चित्र दाखविण्याचा प्रयत्न-शरद पवार
  3. Sanjay Raut : राज्याचे गृहमंत्री काय करतायत? कुठे आहेत पोलीस? संजय राऊतांचा गुन्हेगारीवरुन फडणवीसांना प्रश्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.