मुंबई Devendra Fadnavis Reaction : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांशी गप्पा मारताना विविध विषयावर मनमोकळेपणे उत्तरे दिली. यावेळी बोलताना मुंबईत झालेल्या प्रदूषणाबाबत त्यांनी (Devendra Fadnavis On Mumbai Air Pollution) चिंता व्यक्त केली आणि याबाबत लवकरच योग्य उपाय शोधू असं म्हटलं आहे.
मी महाराष्ट्रातच राहणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता केंद्रात जाणार असून, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलावलं आहे का? यावर फडणवीस म्हणाले की, मला अजूनतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कसलंही बोलावणं आलेलं नाही. मी महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातच राहणार आहे. मी मुंबईतून नव्हे तर नागपुरातूनच विधानसभेची निवडणूक लढवणार आहे.
पाच राज्यांमध्ये भाजपाला यश : पाच राज्यांमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये (Assembly Elections) निश्चितच भारतीय जनता पार्टीला यश येईल. राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेत येईल. तर मध्य प्रदेशातील सत्ता टिकवण्यात भाजपाला यश मिळेल अशी सध्याची परिस्थिती आहे. असा दावा फडणवीस यांनी यावेळी केला.
राजकीय फटाके फोडणार नाही : महाराष्ट्रामध्ये राजकारणात कोण कोणाचा वैरी नाही. अजूनही महाराष्ट्रातील राजकारण मारामारीच्या पातळीवर किंवा हिंसक पातळीवर उतरलेलं नाही. त्यामुळं दिवाळीच्या काळात आनंदाचे आणि उत्साहाचे फटाके आपण फोडतो, राजकीय फटाके फोडणार नाही. या काळात सर्वच पक्षाच्या नेत्यांना आपण दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना सुद्धा शुभेच्छा दिल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी अमृता फडणवीस (Amruta fadnavis) या सुद्धा त्यांच्यासोबत होत्या. यावेळी अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस हे कुटुंबाला फार कमी वेळ देतात. मात्र एवढ्या त्यांच्या व्यग्र कार्यक्रमांमधून सुद्धा आम्हा कुटुंबीयांना मथुरा आणि वृंदावन येथे दर्शनासाठी घेऊन गेले हा आमच्यासाठी आश्चर्याचा धक्का होता.
हेही वाचा -
Rohit Pawar On Devendra Fadnavis : “वाद निर्माण करण्याचा फडणवीसांचा डाव ”, पवारांच्या विधानानं खळबळ
Devendra Fadnavis : काँग्रेसवाल्यांना स्मृतिभ्रंश, देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल