ETV Bharat / state

Maha Budget 2023 : अर्थसंकल्पात टॅक्सबाबत महत्वाच्या घोषणा; वाचा एका क्लिकवर...

राज्य सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केला. या अर्थसंकल्पात टॅक्सबाबत महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

Maha Budget 2023
अर्थसंकल्प
author img

By

Published : Mar 9, 2023, 10:22 PM IST

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज सादर अधिवेशनात सादर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकारने यावेळी करावरील देखील सूटविषयी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.

महिला व दिव्यांगांसाठी महत्वाची घोषणा : अर्थसंकल्पातून राज्यातील महिलांना दिलासा मिळाला आहे. महिलांना आता मासिक 25,000 रुपयांपर्यंतचे उत्पन्न व्यवसाय करमुक्त करण्यात आले आहेत. यापूर्वी ही मर्यादा मासिक 10,000 रुपये होती, ती आता 25,000 रुपये इतकी करण्यात आली आहे. तसेच दिव्यांगांसाठी देखील राज्य सरकारने कराविषयी महत्वाचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींच्या व्याख्याबदलामुळे असंख्य दिव्यांगांची व्यवसायकरातून सुटका करण्यात आल्याचे राज्य सरकारने अर्थसंकल्पात नमूद केले आहे.

हवाई विकासाला चालना : हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केला आहे. राज्य सरकारने याकरिता एटीएफ मूल्यवर्धित कर (व्हॅट) 18 टक्के इतका निर्धारित केला आहे. अर्थकारणाला चालना देण्यासोबतच हवाई वाहतुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगितले.

असा असेल मूल्यवर्धित कराचा दर : बृहन्मुंबई महापालिका, पुणे महापालिका आणि रायगड जिल्हा या तीन क्षेत्रात विमानचालन चक्की इंधनावरील (एटीएफ) मूल्यवर्धित कराचा दर 25 टक्क्यांहून आता 18 टक्के इतका करण्यात आला आहे. राज्याच्या या निर्णयामुळे हा कर बंगळुरु आणि गोव्याच्या समकक्ष करण्यात आला आहे.

राज्यकर विभागाची अभय योजना : महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना-2023 जाहीर असे अभय योजनेचे नाव असणार आहे. या योजनेचा कालावधी मे 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. कोणत्याही वर्षासाठी, व्यापार्‍याची थकबाकी 2 लाखांपर्यंत असल्यास ती रक्कम पूर्णपणे माफ, 1 लाख लहान व्यापार्‍यांना लाभ असणार आहे. कोणत्याही वैधानिक आदेशानुसार, थकबाकी 50 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा प्रकरणात एकूण थकबाकीच्या 20 टक्के रक्कम भरल्यास उर्वरित 80 टक्के रक्कम माफ, सुमारे 80,000 मध्यम व्यापार्‍यांना लाभ होणार आहे.

हेही वाचा : Maha Budget 2023 : राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; वाचा महत्वाचे मुद्दे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.