ETV Bharat / state

Devendra Fadnavis : इंदिरा गांधींनी संसदेचे केलेले उद्घाटन लोकशाहीविरोधी नव्हते का? देवेंद्र फडणवीसांचा सवाल - देवेंद्र फडणवीस नवीन संसद इमारत उद्घाटन

देशभरातील एकूण 19 विरोधी पक्षांनी संसदेची नवीन इमारतीचे उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या विविध समस्येबाबत मार्ग काढत असल्याची माहितीदेखील त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

Devendra Fadnavis on new parliament building
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : May 24, 2023, 6:03 PM IST

Updated : May 24, 2023, 8:08 PM IST

मुंबई- विरोधकांचा लोकशाहीच्या मंदिरावर विश्वास नाही. नवी संसद ही देशाची ताकद आहे. त्यामुळे देशाची प्रतिमा उंचावणार आहे. लोकशाहीत कावीळ झाल्यासारखे वागणे अयोग्य आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. इंदिरा गांधींनी संसदेचे केलेले उद्घाटन लोकशाहीविरोधी नव्हते का, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की कृषी कर्जात सिबिल अट लागू होत नाही. शेतकऱ्यांना कर्ज नाही दिल्यास एफआयआर दाखल करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी 12 तास वीज देण्यासाठी सोलर योजना लागू केल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकारने सेंट्रल व्हिस्टा येथील नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनाची तयारी सुरू केली आहे. मात्र, या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात न आल्याने विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.

  • Mumbai | The decision taken by the opposition shows that they do not have faith in democracy. It is not just the building of India's Lok Sabha, it is the building of strength of New India. Indira Gandhi inaugurated the Parliament Annexe building in 1975, Rajiv Gandhi did the… pic.twitter.com/IWd8f16DWA

    — ANI (@ANI) May 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यापूर्वीदेखील देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिला होता इशारा- शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देताना कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांना सिबिलची अट घालू नये, असे आदेश उपमुख्यमंत्री यांनी नुकतेच अमरावतीमध्ये दिले होते. कोणत्याही बँकेने पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलचे कारण त्रास देऊ नये, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. अमरावती जिल्ह्यातील काही बँकांनी अनुदानाचे पैसे हे कर्ज खात्यात टाकल्याची सरकारने गंभीर घेतली आहे. अनुदानाचे कुठलेही पैसे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात टाकू नये. याचे पालन न करणाऱ्या बँकांना नोटीस दिल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

केजरीवाल-ठाकरे या दोघांना एकमेकांची गरज आहे. विरोधक एकत्र आले तरी भाजपवर परिणाम होत नाही. केजरीवाल-ठाकरे भेटीवरून महाराष्ट्राची ताकद दिसत आहे. सापनाथ, नागनाथ साथ जाओ- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सापनाथ, नागनाथ साथ जाओ- आपचे संस्थापक अध्यक्ष तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. 2024 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षनेत्यांच्या भेटीला महत्त्व आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधकांकडून एकीचे प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्री भगवान मान यांनी मुंबईत येऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत दोन तास सविस्तर चर्चा केली आहे.

हेही वाचा-

  1. Uddhav Thackeray : राज्यात निवडणूक होणारच नाही; असे का म्हणाले उद्धव ठाकरे? घ्या जाणून...
  2. Arvind Kejriwal Met Uddhav Thackeray : आजपासून सत्ताधाऱ्यांना विरोधी म्हणा, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
  3. New Parliament Building : कॉंग्रेससह 19 विरोधी पक्षांचा नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार

Last Updated : May 24, 2023, 8:08 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.