मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील भारत बचाओ रॅलीमध्ये सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यानतंर देशाभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी केलेले विधान अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागवी. केवळ आडनाव गांधी असल्याने कोणी गांधी होत नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे.
-
Devendra Fadnavis, BJP: Rahul Gandhi's statement is shameful, maybe he does not know about Savarkar ji. He faced torture for 12 years in the cells of Andaman jail, Rahul Gandhi cannot do it for even 12 hours. Just putting Gandhi in your name doesn't make you a Gandhi. https://t.co/Q18DVDJSMr pic.twitter.com/48ft6BYDkP
— ANI (@ANI) December 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Devendra Fadnavis, BJP: Rahul Gandhi's statement is shameful, maybe he does not know about Savarkar ji. He faced torture for 12 years in the cells of Andaman jail, Rahul Gandhi cannot do it for even 12 hours. Just putting Gandhi in your name doesn't make you a Gandhi. https://t.co/Q18DVDJSMr pic.twitter.com/48ft6BYDkP
— ANI (@ANI) December 14, 2019Devendra Fadnavis, BJP: Rahul Gandhi's statement is shameful, maybe he does not know about Savarkar ji. He faced torture for 12 years in the cells of Andaman jail, Rahul Gandhi cannot do it for even 12 hours. Just putting Gandhi in your name doesn't make you a Gandhi. https://t.co/Q18DVDJSMr pic.twitter.com/48ft6BYDkP
— ANI (@ANI) December 14, 2019
यावेळी फडणवीस म्हणाले, या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केवळ कारावासच भोगला, असे नाही. त्यांनी अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा दिली. भारताच्या इतिहासामध्ये 2 वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झालेला क्रांतीवीर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. 12 वर्षे अंदमानच्या कोठडीत त्यांनी अत्याचार सहन केला. राहुल गांधींना याची कल्पना तर आहे का? असा सवालही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. तर 12 वर्षे सोडा 12 तास तरी राहुल गांधी अशा कोठडीत राहू शकतात का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
त्यामुळे हा सावरकरांचा अपमान हा देश कधीच सहन करणार नाही. राहुल गांधीनी समजून घेतले पाहिजे, केवळ गांधी आडनाव लावून कोणी गांधी होत नाही. त्यासाठी कष्ट करावे लागतात, त्याग करावा लागतो. महाराष्ट्र आणि देश राहुल गांधीना कधीही माफ करु शकणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
सत्तेसाठी शिवसेना सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत -
सत्तेसाठी शिवसेना आज अश्या लोकांसोबत आहे की, जे स्वांतत्र्यवीर सावरकर यांचा देखील अपमान करतात. तर यावर शिवसेनेची आलेली प्रतिक्रिया किती मवाळ आहे. यापूर्वीच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या आहेत. त्यांना त्यांची सत्ता लखलाभ, सावरकरांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, शनिवारी काँग्रेस पक्षाकडून भारत बचाव रॅलीचे अयोजन करण्यात आले होते. त्यावेळी, मी माफी मागणार नाही. माफी मागायला मी राहुल सावरकर नाही तर, राहुल गांधी आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते.