मुंबई - मंगळवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर अजित पवारांचा पाठिंबा का स्वीकारला? असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, योग्य वेळ आल्यावर बोलेन, असे वक्तव्यं फडणवीस यांनी केले आहे.
-
Devendra Fadnavis on if it was a mistake to ally with Ajit Pawar: I will say the right thing at the right time, don't worry. pic.twitter.com/NSpq0tU2iO
— ANI (@ANI) November 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Devendra Fadnavis on if it was a mistake to ally with Ajit Pawar: I will say the right thing at the right time, don't worry. pic.twitter.com/NSpq0tU2iO
— ANI (@ANI) November 27, 2019Devendra Fadnavis on if it was a mistake to ally with Ajit Pawar: I will say the right thing at the right time, don't worry. pic.twitter.com/NSpq0tU2iO
— ANI (@ANI) November 27, 2019
हेही वाचा - सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले, एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर
महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्याने नवे सरकार स्थापन झाले. मात्र, तीनच दिवसांत हे सरकार कोसळले. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार असल्याचे निश्चित झाले आहे.