मुंबई - आम्ही 19 हजार कोटींची कर्जमाफी केली. पण, राज्य सरकारने निवडणुकीवेळी हेक्टरी 25 हजारांची मदत आणि साताबारा कोरा करण्याचे आश्वास दिले. पण, एका दमड्याचीही कर्जमाफी झाली नाही. महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना वेड्यात काढायचे काम सुरू आहे, अशी टीका सरकावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आज राज्यभर भाजपचे धरणे आंदोलन केले जात आहे. आझाद मैदानावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू असून त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेवर फडणवीसांनी सडकून टीका केली. तसेच एमआयएमचे माजी आमदार वारिस पठाणांवरही टीका केली.
हेही वाचा - कर्जमाफी, महिला अत्याचाराबाबत विधानसभेत विरोधकांचा गदारोळ, कामकाज दिवसभरासाठी तहकूब